बिजनौर (उत्तर प्रदेश) : अभिनेता शाहिद कपूरचा ‘चुप चुप के’ हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. या चित्रपटात, कर्जबाजारी झालेला जीतू (शाहिद कपूर) आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वडिलांना विम्याच्या पैशाने सर्व कर्ज फेडता यावेत असा जीतूचा उद्देश असतो. हा विचार करून तो नदीत उडी घेतो. बराच शोध घेऊनही त्याचा मृतदेह सापडत नाही. अशी आहे चित्रपटातील कथा. मात्र, आता रीलमधील ही कथा खऱ्या आयुष्यातही तशीच घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे घडली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तरुणाने घर सोडले. तो मृत पावल्याची बातमी त्याच्या कुटुंबीयांनीही नातेवाईक आणि समाजामध्ये पसरवली. मात्र, तेराव्याच्या एक दिवस आधी तो जिवंत परतला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. (The dead young man returned home alive while the thirteenth was being prepared at home)

हे संपूर्ण प्रकरण बिजनौरमधील हलदौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जगनवाला गावातील आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तरुणावर गावकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे कर्ज होते. गावप्रमुख कमल सिंह यांनी सांगितले की, ६ सप्टेंबर रोजी तरुणाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. विशिष्ट प्रकारचा किटक चावल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह गंगेत सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

PM Modi’s Birthday: पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त तयार केली जातेय ‘५६ इंच थाळी’; विजेत्याला मिळणार खास गिफ्ट
तेराव्याच्या एक दिवस आधी परत आला तरुण

गुरुवारी मृत घोषित करण्यात आलेल्या तरुणाचे तेरावे विधी होणार होते. घरी त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली. मात्र, मृत घोषित केलेला तरुण बुधवारी रात्री तेराव्याच्या एक दिवस आधी गावात परतल्यावर या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले.

संतापजनक! स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवलं, पण दररोज १०-१५ जणांकडून अल्पवयीनवर अत्याचार
तरुणाला जिवंत पाहून झोपच उडाली

गुरुवारी सकाळी या तरुणाला जिवंत पाहून ग्रामस्थ चक्रावून गेले. याबाबत तरुण व त्याच्या कुटुंबीयांशी बोलले असता त्यांनी तरुण कामानिमित्त बाहेर गेला होता असे सांगितले. आता पोलीस या तरुणाच्या मृत्यू हे ढोंग होते का, याची चौकशी करत आहेत.

तीन कोटी रोख, ५० किलो सोनं, १३ काडतुसं, पाहा महंत नरेंद्र गिरींच्या खोलीत काय-काय सापडलंSource link

Leave a Reply

Your email address will not be published.