ईव्हीएम’विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार:डॉ.हुलगेश चलवादी याचिका करणार दाखल

ईव्हीएम’विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार:डॉ.हुलगेश चलवादी याचिका करणार दाखल

राज्यातील प्रतिष्ठित लढत समजल्या जाणाऱ्या वडगाव शेरी मतदार संघात धक्कादायक निकाल समोर आले आहेत. ५० हजारांहून अधिकची हक्काची मतं असून देखील तेवढीही मतं न मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आणि प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.२३) केला.ईव्हीएम यंत्रणेसंबंधी अनेक तक्रारी असून देखील त्यावरच निवडणूकीचे चक्र अवलंबून असल्याने आता याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती डॉ.चलवादींनी दिली आहे. प्रस्थापित पक्षांनी यावेळी मतदार संघात पैशांचे अमाप वाटप केल्याने हा धनबलाचा आणि ईव्हीएमचा कौल आहे; जनमताचा नाही, अशी खंत देखील डॉ.चलवादी यांनी बोलून दाखवली.वडगाव शेरी मतदार संघात जवळपास १५० कोटींचे वाटप झाल्याचा धक्कादायक आरोप देखील त्यांनी यावेळी केला.मतदार संघात दलित, मागासवर्गीय, ओबीसी,अल्पसंख्याक मतदारांची मोठी संख्या आहे. ही सर्व मतदार बहुजन समाज पक्षांच्या बाजूने कौल देतात मात्र, निकालात ते दिसून आले नाही. केवळ ३ हजार ७६२ मतं मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ झाल्याचा संशय डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला आहे. वडागाव शेरी मतदार संघातील सर्व जनता ठामपणे पाठिशी उभी असतांना देखील प्रत्यक्षात मिळालेली मतं बघता हा निकाल जनतेचा नाही, तर भ्रष्ट ईव्हीएमचा असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.यामुळे मतपत्रावर निवडणूक होणे आवश्यक आहे. जेणेकरून मतदारांचे खर मत कुणाला हे कळत.आता ईव्हीएम विरोधात अधिक तीव्र आंदोलन उभारू असे ते म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment