मुंबई टाइम्स टीम-

तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातील चिंची चेटकीणीची भूमिका अतिशय गाजली. या चेटकीणीची भूमिका गाजवणारा अभिनेता वैभव मांगले मात्र आता या भूमिकेत दिसणार नाही. वैभवनं हे नाटक सोडलं असून, याऐवजी निलेश गोपनारायण हा नवा कलाकार यापुढे चेटकीण साकारताना दिसणार आहे. नव्या चेटकीणीसह ‘अलबत्या गलबत्या’चा पहिला प्रयोग साताऱ्यात शनिवारी होणार आहे.

सिंगल का आहे ललित प्रभाकर, अभिनेत्याचं कारण तुम्हालाही पटेल

‘अलबत्या…’ या बालनाट्याचे प्रयोग जोरात सुरू होते. परंतु, वैभवची आणखी नाटकंही रंगभूमीवर सुरू आहेत. या प्रयोगांमुळे ‘अलबत्या..’च्या तारखांचं गणित जमत नव्हतं, असं कळतं. ‘प्रयोग लावता न आल्यानं नुकसान होत असेल तर रिप्लेसमेंट पाहा’, असं वैभवनं निर्मात्यांना सांगितलं होतं. त्यानुसार, सुमारे महिनाभर आधी वैभवनं या नाटकाचे प्रयोग करणं थांबवलं आहे. यानंतर गोपनारायण या नवीन कलाकाराला घेऊन ‘अलबत्या गलबत्या’चे प्रयोग होणार आहेत. ‘मी चिंची चेटकीणीचं काम सोडलं आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि तुमचा भ्रमनिरास होईल. ती मी नाहीच’ असं वैभवनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.


मला अनेक गोष्टींमुळे हे नाटक करणं जमत नाहीय. माझ्या तारखा अॅडजस्ट होत नाहीयत किंवा कुणाला त्या करायच्या नाहीयत म्हणा. त्यामुळे नाटकाचे प्रयोग करता येणं शक्य नाही. माझ्या जागी नवीन मुलाला घेतलं आहे, त्याला खूप शुभेच्छा. फक्त त्यानं रंगरुपासहीत स्वत:ची चेटकीण करावी. माझ्यासारखी चेटकीण त्याला करायला लावणं हा त्याच्यावर अन्याय आहे. त्या मुलानं स्वत:ची वेगळी चेटकीण करावी. वैभव मांगलेसारखा दिसणारा गेटअप करून, मीच नाटकात आहे असं भासवून लोकांना फसवू नये.

– वैभव मांगले, अभिनेता

निळू फुले यांच्या बायोपिकवर सुरू झालं काम, दिग्दर्शक तर प्रसाद ओक पण हिरो कोण?

वैभव मांगले यांचे इतर नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. परिणामी होणाऱ्या धावपळीमुळे त्यांना पूर्ण वेळ ‘अलबत्या…’ या नाटकासाठी देता येत नाहीय. एक निर्माता म्हणून मला माझ्या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करायचे आहेत. प्रमुख कलाकाराच्या वेळेअभावी ते सध्या होत नाहीय. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊन नव्या कलाकाराची निवड केली आहे. पण चेटकीणीच्या गेटअपमध्ये नवा कलाकार तसाच दिसत असेल त्याला आपण काय करणार?

– राहुल भंडारे, निर्माता (अलबत्या गलबत्या)

‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटात

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.