बंगळुरु : जे या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना जमले नाही ते श्रेयस अय्यरने करून दाखवले. श्रेयसने या सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले आणि सर्वांची मनं जिंकली. पण श्रेयसबबात द्रविड यांना विश्वास होता. द्रविड यांनी या सामन्यापूर्वी श्रेयसबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. श्रेयसच्या फलंदाजीचे सिक्रेटही द्रविड यांनी यावेळी सांगितले होते.

‘श्रेयस क्रिकेटपटू म्हणून वेगळाच आहे. तो भारतीय ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करायचा तेव्हापासून मी त्याची कामगिरी बघतो आहे. त्याला यश आणि अपयश खूप चांगल्या पद्धतीने हाताळता येते. दडपणाच्या स्थितीत तो सर्वोत्तम कामगिरी करून दाखवितो. श्रेयस कणखर मानसिकतेचा खेळाडू आहे. क्रिकेटपटू हा असाच हवा. त्यामुळे त्याची कामगिरी, योगदानाबाबत खात्री असते,’ असे कौतुक द्रविड करतात. श्रेयस हा दडपण असले तरी तो सर्वोत्तम कामगिरी करतो, हा विश्वास द्रविड यांनी आहे आणि हेच त्याच्या फलंदाजीचे सिक्रेट आहे.

या सामन्यापूर्वी श्रेयसला शतक झळकावता आले नव्हते. त्याबद्दल राहुल द्रविड म्हणाले की, ‘फक्त शतके, अर्धशतकांवरून मधल्या फळीला जोखू नका. त्या फलंदाजांकडून झालेल्या ३०, ४० धावाही संघाची धावसंख्या वाढवणाऱ्या ठरतात. जे खूप महत्त्वाचे आहे. श्रेयस, केएल (राहुल), सूर्या आणि जड्डू (रवींद्र जाडेजा) या साऱ्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. धरमशाला सामन्यातील जड्डूची खेळी आठवून बघा. त्याने आपल्या छोटेखानी खेळीने संघाचा विजय साकारला होता. या छोट्या खेळीही खूप महत्त्वाच्या आणि प्रसंगी मोठ्याच ठरतात,’ द्रविड उदाहरणासह स्पष्ट करतात.

या सामन्यात रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दमदार अर्धशतकं झळकावली खरी, पण कोणालाही शतक झळकावता आले नव्हते. पण श्रेयसने मात्र या सामन्यात शतक झळकावले आणि त्याने ही कसर भरून काढली. या सामन्यात शतक झळकावणारा तो भारताचा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कपमधील त्याचे हे पहिलेच शतक असल्याचेही आता समोर आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *