नागपूर विमानतळावर राडा:ठाकरे गटाच्या आक्रमक शिवसैनिकांमुळे पोलिसांनी नीतेश राणेंना मागच्या दाराने बाहेर नेले

नागपूर विमानतळावर राडा:ठाकरे गटाच्या आक्रमक शिवसैनिकांमुळे पोलिसांनी नीतेश राणेंना मागच्या दाराने बाहेर नेले

नागपूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर गोळा झाले असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे अमरावती जिल्ह्यात अचलपूरला जाण्यासाठी दुपारी नागपूरला विमानाने पोहचले. राणे नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिसताच शिवसैनिक संतप्त झाले व त्यांनी राणेंच्या विरोधात आक्रमक होत जोरदार घोषणबाजी केली. दरम्यान गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी राणे यांना मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढले व गाडीमध्ये बसवून रवाना केले. अचलपूरला आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने नितेश राणे रविवारी दुपारी नागपुरात पोहचले. दरम्यान कळमेश्वर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक विमातळावर गोळा झाले होते. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असलेले नीतेश राणे विमानतळावरच्या बाहेर येत असल्याचे कळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांच्या बंदोबस्तात राणे विमानतळाच्या बाहेर नीतेश राणे यांच्या स्वागतासाठी केवळ दहा ते बारा कार्यकर्ते बाहेर उभे होते. राणे बाहेर येत असताना पोलिसांनी त्यांना प्रारंभी आतमध्ये थांबण्यास सांगितले. परंतु, शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याने पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, राणे यांना दुसऱ्या मार्गाने बाहेर काढण्यासाठी नियोजन केले. मात्र शिवसैनिकांना माहिती पडताच शेकडो शिवसैनिक त्या प्रवेशद्वाराकडे धावले आणि तिथे जाऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात राणे यांना विमानतळाच्या बाहेर काढले गाणि गाडीमध्ये बसून विमानतळावरुन रवाना केले. घोषणाबाजीचा मला फरक पडत नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने मला कुठेही जाण्याची आणि सभा घेण्याचा अधिकार दिला आहे. मी ठाकरे गटावर टीका करीत राहाणार आहे. त्यांच्याकडे आता घोषणा देणे एवढेच काम उरले आहे. त्यांचा तेवढाच जीव राहिलाय. जी काही वाचलेली शिवसेना आहे. ती बंटी- बबली ( संजय राऊत, उद्धव ठाकरे) यांना खुश करण्यासाठी या घोषणा देत आहे. मात्र मला काही फारक पडत नाही, असे भाजप आमदार नीतेश राणे म्हणाले. ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिला घोषणा देणारे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. गेल्या काही दिवसांपासून राणे ठाकरे गटातील नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करीत आहे. त्यामुळे कार्यकर्त्याचा राणे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचा आणि खऱ्या शिवसैनिकांचा जोश काय असतो, हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे, असे ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

​नागपूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर गोळा झाले असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे अमरावती जिल्ह्यात अचलपूरला जाण्यासाठी दुपारी नागपूरला विमानाने पोहचले. राणे नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिसताच शिवसैनिक संतप्त झाले व त्यांनी राणेंच्या विरोधात आक्रमक होत जोरदार घोषणबाजी केली. दरम्यान गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी राणे यांना मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढले व गाडीमध्ये बसवून रवाना केले. अचलपूरला आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने नितेश राणे रविवारी दुपारी नागपुरात पोहचले. दरम्यान कळमेश्वर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक विमातळावर गोळा झाले होते. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असलेले नीतेश राणे विमानतळावरच्या बाहेर येत असल्याचे कळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांच्या बंदोबस्तात राणे विमानतळाच्या बाहेर नीतेश राणे यांच्या स्वागतासाठी केवळ दहा ते बारा कार्यकर्ते बाहेर उभे होते. राणे बाहेर येत असताना पोलिसांनी त्यांना प्रारंभी आतमध्ये थांबण्यास सांगितले. परंतु, शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याने पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, राणे यांना दुसऱ्या मार्गाने बाहेर काढण्यासाठी नियोजन केले. मात्र शिवसैनिकांना माहिती पडताच शेकडो शिवसैनिक त्या प्रवेशद्वाराकडे धावले आणि तिथे जाऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात राणे यांना विमानतळाच्या बाहेर काढले गाणि गाडीमध्ये बसून विमानतळावरुन रवाना केले. घोषणाबाजीचा मला फरक पडत नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने मला कुठेही जाण्याची आणि सभा घेण्याचा अधिकार दिला आहे. मी ठाकरे गटावर टीका करीत राहाणार आहे. त्यांच्याकडे आता घोषणा देणे एवढेच काम उरले आहे. त्यांचा तेवढाच जीव राहिलाय. जी काही वाचलेली शिवसेना आहे. ती बंटी- बबली ( संजय राऊत, उद्धव ठाकरे) यांना खुश करण्यासाठी या घोषणा देत आहे. मात्र मला काही फारक पडत नाही, असे भाजप आमदार नीतेश राणे म्हणाले. ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिला घोषणा देणारे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. गेल्या काही दिवसांपासून राणे ठाकरे गटातील नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करीत आहे. त्यामुळे कार्यकर्त्याचा राणे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचा आणि खऱ्या शिवसैनिकांचा जोश काय असतो, हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे, असे ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment