टोल वसुलीच्या तिढ्यामुळे अहमदनगर-शिरुर, देवगड-संभाजीनगर महामार्गाच्या सुधारणेला खोडा:112 किमीचा महामार्ग MIDCकडे होणार नाही हस्तांतरित‎

टोल वसुलीच्या तिढ्यामुळे अहमदनगर-शिरुर, देवगड-संभाजीनगर महामार्गाच्या सुधारणेला खोडा:112 किमीचा महामार्ग MIDCकडे होणार नाही हस्तांतरित‎

राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या सुधारणेसाठी १९ सप्टेंबरला शासनादेश काढला. यात पूर्ण महामार्गावरील चारही टप्प्यांची सुधारणा करण्याऐवजी शिरूर ते पुणे (५४ किमी) सहापदरी उन्नत मार्ग, नगर ते देवगड (४२ किमी) या दोन टप्प्यांची सुधारणा बीओटी किंवा ईपीसी तत्त्वावर करण्याचे जाहीर केले. पण त्याचवेळी शिरूर ते अहमदनगर (५० किमी) व वडाळा ते छत्रपती संभाजीनगर (६२ किमी) अशा ११२ किमीच्या दोन महत्त्वाच्या टप्प्यांची सुधारणा केली जाणार नाही. या दोन्ही ठिकाणी पथकर वसुलीची मुदत अनुक्रमे डिसेंबर २०२९ व जानेवारी २०३७ पर्यंत असल्याने हे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हस्तांतरीत होणार नाहीत. परिणामी ११२ किमीवरील प्रवास वरील मुदतीपर्यंत खडतरच राहणार आहे. दरम्यान, उर्वरित कालावधीतील टोलवसुलीवर राज्य सरकारने मार्ग काढल्यास या दोन्ही टप्प्याच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे अधिकारी सूत्रांचे म्हणणे आहे. नगर-देवगड या ४२ किमी महामार्गाच्या सुधारण्यासाठी राज्य सरकारने ४१० कोटी देण्याचा शासन निर्णय जारी केला असला तरी प्रत्यक्षात या महामार्गाचे रुंदीकरण, विस्तारीकरण होणार नाही. आहे त्या मार्गाचीच दुरुस्ती यातून केली जाणार आहे. सध्याचा छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर-पु णे राष्ट्रीय महामार्गा दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे शिरूर ते खराडी दरम्यान ५३ किलोमीटर अंतरावर ७ हजार ५१५ कोटींचा सहा पदरी उन्नत मार्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर नगर ते देवगड हा महामार्ग सुधारण्यासाठी ४१० कोटीचा प्रकल्प एमएसआयडसीमार्फत करण्यात येणार आहे. 2029 नगर-शिरूर टोलवसुलीची मुदत 2037 देवगड-संभाजीनगर टोलवसुलीची मुदत १५ दिवसांत निविदा ^ शिरूर -पुणे उन्नत महामार्गासाठी पुढच्या पंधरा दिवसात निविदा प्रसिद्ध होणार आहे. नगर-देवगड हा महामार्ग सुधारण्यासाठी ४१० कोटींच्या प्रकल्प एमएसआयडसी मार्फत राबवण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णयदेखील झाला आहे. नगर -शिरूर, देवगड -संभाजीनगर या महामार्गाची मुदत अद्याप संपुष्टात आलेली नाही. -रणजीत हांडे, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुंबई. कंत्राटदाराला मोबदला देऊन विषय मिटवावा ^ छत्रपती संभाजीनगर -पुणे हा महामार्ग सहा पदरी करावा, अशी मागणी यापूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नगर-शिरूर, देवगड -संभाजीनगर महामार्ग सध्या खाजगी कंत्राटदाराकडे आहे. त्याच्या टोल मोबदल्याचा विषय संपून हा महामार्ग आपल्याकडे घ्यावा. विशेष म्हणजे संपूर्ण महामार्ग झाल्यास सुपा, वाळूंज, शिक्रापूर, शिरूर या एमआयडीसीला याचा निश्चित फायदा होईल. – नीलेश लंके, खासदार.

​राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या सुधारणेसाठी १९ सप्टेंबरला शासनादेश काढला. यात पूर्ण महामार्गावरील चारही टप्प्यांची सुधारणा करण्याऐवजी शिरूर ते पुणे (५४ किमी) सहापदरी उन्नत मार्ग, नगर ते देवगड (४२ किमी) या दोन टप्प्यांची सुधारणा बीओटी किंवा ईपीसी तत्त्वावर करण्याचे जाहीर केले. पण त्याचवेळी शिरूर ते अहमदनगर (५० किमी) व वडाळा ते छत्रपती संभाजीनगर (६२ किमी) अशा ११२ किमीच्या दोन महत्त्वाच्या टप्प्यांची सुधारणा केली जाणार नाही. या दोन्ही ठिकाणी पथकर वसुलीची मुदत अनुक्रमे डिसेंबर २०२९ व जानेवारी २०३७ पर्यंत असल्याने हे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हस्तांतरीत होणार नाहीत. परिणामी ११२ किमीवरील प्रवास वरील मुदतीपर्यंत खडतरच राहणार आहे. दरम्यान, उर्वरित कालावधीतील टोलवसुलीवर राज्य सरकारने मार्ग काढल्यास या दोन्ही टप्प्याच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे अधिकारी सूत्रांचे म्हणणे आहे. नगर-देवगड या ४२ किमी महामार्गाच्या सुधारण्यासाठी राज्य सरकारने ४१० कोटी देण्याचा शासन निर्णय जारी केला असला तरी प्रत्यक्षात या महामार्गाचे रुंदीकरण, विस्तारीकरण होणार नाही. आहे त्या मार्गाचीच दुरुस्ती यातून केली जाणार आहे. सध्याचा छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर-पु णे राष्ट्रीय महामार्गा दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे शिरूर ते खराडी दरम्यान ५३ किलोमीटर अंतरावर ७ हजार ५१५ कोटींचा सहा पदरी उन्नत मार्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर नगर ते देवगड हा महामार्ग सुधारण्यासाठी ४१० कोटीचा प्रकल्प एमएसआयडसीमार्फत करण्यात येणार आहे. 2029 नगर-शिरूर टोलवसुलीची मुदत 2037 देवगड-संभाजीनगर टोलवसुलीची मुदत १५ दिवसांत निविदा ^ शिरूर -पुणे उन्नत महामार्गासाठी पुढच्या पंधरा दिवसात निविदा प्रसिद्ध होणार आहे. नगर-देवगड हा महामार्ग सुधारण्यासाठी ४१० कोटींच्या प्रकल्प एमएसआयडसी मार्फत राबवण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णयदेखील झाला आहे. नगर -शिरूर, देवगड -संभाजीनगर या महामार्गाची मुदत अद्याप संपुष्टात आलेली नाही. -रणजीत हांडे, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुंबई. कंत्राटदाराला मोबदला देऊन विषय मिटवावा ^ छत्रपती संभाजीनगर -पुणे हा महामार्ग सहा पदरी करावा, अशी मागणी यापूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नगर-शिरूर, देवगड -संभाजीनगर महामार्ग सध्या खाजगी कंत्राटदाराकडे आहे. त्याच्या टोल मोबदल्याचा विषय संपून हा महामार्ग आपल्याकडे घ्यावा. विशेष म्हणजे संपूर्ण महामार्ग झाल्यास सुपा, वाळूंज, शिक्रापूर, शिरूर या एमआयडीसीला याचा निश्चित फायदा होईल. – नीलेश लंके, खासदार.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment