तापमान वाढल्याने राज्यात आपत्कालीन भारनियमन:राज्यभरात विजेची सात हजार मेगावॅट तूट

तापमान वाढल्याने राज्यात आपत्कालीन भारनियमन:राज्यभरात विजेची सात हजार मेगावॅट तूट

पितृपक्षात तापमान वाढीमुळे शेतीत वीजपंपांचा वापर वाढला, परिणामी कृषी क्षेत्रातून अचानक विजेची मागणी वाढली आहे. यामुळे महावितरणने राज्यभरातील सर्व कृषी जोडणी तसेच घरगुती अर्थात गावठाण वापराच्या जी- १, जी- २ व जी-३ या वितरण ग्रुपवर चार दिवसांपासून (१९ सप्टेंबर) आपत्कालीन भारनियमन सुरू केले आहे. राज्याची वीज मागणी गेल्या आठवड्यात २२ हजार मेगावॅटवर होती. ती गुरुवारपासून २४ हजार ८०७ ते २५ हजार ५०० मेगावॅटपर्यंत पोहोचली, तर दुसरीकडे महानिर्मिती व खासगी वीजनिर्मिती केंद्रातून केवळ १६ हजार ५०० ते १७ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. राज्यात जवळपास सात हजार मेगावॅटची तूट आहे. निवडणुकीवर परिणाम नको म्हणून २१ लाख टन कोळसा
कोळसा टंचाईमुळे राज्याची वीजनिर्मिती कमी होऊन ऑक्टोबर हीटमध्ये आपत्कालीन भारनियमन करावे लागते. यंदा मात्र अधिक प्रमाणात पाऊस होऊनही केवळ आगामी काळात विधानसभा निवडणूक असल्याने ऊर्जा विभागाने ३१.११ दिवस पुरेल इतका २१ लाख मेट्रिक टन कोळसा साठा केला आहे. खाणींमधून दररोज कोळसा उपलब्ध होत असल्याने यंदा टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांनी दिली.

​पितृपक्षात तापमान वाढीमुळे शेतीत वीजपंपांचा वापर वाढला, परिणामी कृषी क्षेत्रातून अचानक विजेची मागणी वाढली आहे. यामुळे महावितरणने राज्यभरातील सर्व कृषी जोडणी तसेच घरगुती अर्थात गावठाण वापराच्या जी- १, जी- २ व जी-३ या वितरण ग्रुपवर चार दिवसांपासून (१९ सप्टेंबर) आपत्कालीन भारनियमन सुरू केले आहे. राज्याची वीज मागणी गेल्या आठवड्यात २२ हजार मेगावॅटवर होती. ती गुरुवारपासून २४ हजार ८०७ ते २५ हजार ५०० मेगावॅटपर्यंत पोहोचली, तर दुसरीकडे महानिर्मिती व खासगी वीजनिर्मिती केंद्रातून केवळ १६ हजार ५०० ते १७ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. राज्यात जवळपास सात हजार मेगावॅटची तूट आहे. निवडणुकीवर परिणाम नको म्हणून २१ लाख टन कोळसा
कोळसा टंचाईमुळे राज्याची वीजनिर्मिती कमी होऊन ऑक्टोबर हीटमध्ये आपत्कालीन भारनियमन करावे लागते. यंदा मात्र अधिक प्रमाणात पाऊस होऊनही केवळ आगामी काळात विधानसभा निवडणूक असल्याने ऊर्जा विभागाने ३१.११ दिवस पुरेल इतका २१ लाख मेट्रिक टन कोळसा साठा केला आहे. खाणींमधून दररोज कोळसा उपलब्ध होत असल्याने यंदा टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांनी दिली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment