कर्जतमध्ये उडीद पिकाला शेंगा न लागल्यामुळे शेतकरी हवालदिल:राहुरी कृषी विद्यापीठाच्या समितीने शेतात जाऊन केली पिकांची पाहणी

कर्जतमध्ये उडीद पिकाला शेंगा न लागल्यामुळे शेतकरी हवालदिल:राहुरी कृषी विद्यापीठाच्या समितीने शेतात जाऊन केली पिकांची पाहणी

यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात मोठ्या प्रमाणात उडदाची पेरणी झाली होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी करताना बियाणे खरेदीच्या पावत्याही सादर केल्या होत्या. प्रामुख्याने निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पिकाला शेंगा लागल्या नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्याची दखल घेत, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी व राहुरी विद्यापीठाचे तज्ञ शास्त्रज्ञांशी लेखी पत्र व्यवहार करून शेतकऱ्यांच्या तक्रारी कळविल्या. राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपविभागीय स्तरावरील समितीसह शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करीत शेतात जाऊन उडीद पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पिकाला शेंगा लागल्या नसून, पिकावर मोठ्या प्रमाणात लव असल्याने आमचे नुकसान झाल्याचे गाऱ्हाणे समितीसमोर मांडले. कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनीही निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पिकाला कमी शेंगा लागल्या असून, पिकावर तपकिरी रंगाचा लव असल्याचे मान्य करताना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे कबूल केले. राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व उपविभागीय कृषी समितीची बैठक पंचायत समितीच्या सभागृहात झाली. यावेळी कडधान्य पैदासकार कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुमेरसिंग राजपूत, राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. पी. पाचारणे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कृषी अधिकारी रूपचंद जगताप, मंडल कृषी अधिकारी अनिल भापकर, निर्मल सिड्स कंपनीचे प्रतिनिधी व कृषी सेवा दुकानदारांचे प्रतिनिधी दत्तात्रय भोसले यांच्यासह कृषी सहाय्यक व सुपरवायझर उपस्थित होते. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा समितीचा निष्कर्ष समितीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या असता, उडदाच्या पिकाच्या जातीस लागलेल्या शेंगावर लव दिसून आली. तसेच, दाण्यांचा रंग फिकट तपकिरी आहे. शेंगामधील दाण्यांचा आकार लहान असून, शेंगांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष समितीतील सर्व सदस्यांनी काढला.

​यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात मोठ्या प्रमाणात उडदाची पेरणी झाली होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी करताना बियाणे खरेदीच्या पावत्याही सादर केल्या होत्या. प्रामुख्याने निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पिकाला शेंगा लागल्या नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्याची दखल घेत, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी व राहुरी विद्यापीठाचे तज्ञ शास्त्रज्ञांशी लेखी पत्र व्यवहार करून शेतकऱ्यांच्या तक्रारी कळविल्या. राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपविभागीय स्तरावरील समितीसह शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करीत शेतात जाऊन उडीद पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पिकाला शेंगा लागल्या नसून, पिकावर मोठ्या प्रमाणात लव असल्याने आमचे नुकसान झाल्याचे गाऱ्हाणे समितीसमोर मांडले. कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनीही निर्मल सिड्स कंपनीच्या उडीद पिकाला कमी शेंगा लागल्या असून, पिकावर तपकिरी रंगाचा लव असल्याचे मान्य करताना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे कबूल केले. राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व उपविभागीय कृषी समितीची बैठक पंचायत समितीच्या सभागृहात झाली. यावेळी कडधान्य पैदासकार कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुमेरसिंग राजपूत, राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. पी. पाचारणे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कृषी अधिकारी रूपचंद जगताप, मंडल कृषी अधिकारी अनिल भापकर, निर्मल सिड्स कंपनीचे प्रतिनिधी व कृषी सेवा दुकानदारांचे प्रतिनिधी दत्तात्रय भोसले यांच्यासह कृषी सहाय्यक व सुपरवायझर उपस्थित होते. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा समितीचा निष्कर्ष समितीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या असता, उडदाच्या पिकाच्या जातीस लागलेल्या शेंगावर लव दिसून आली. तसेच, दाण्यांचा रंग फिकट तपकिरी आहे. शेंगामधील दाण्यांचा आकार लहान असून, शेंगांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष समितीतील सर्व सदस्यांनी काढला.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment