तेरा मित्रपक्षांना जागा देण्याच्या घोषणेमुळे महायुतीत खळबळ:बावनकुळेंची घोषणा – कडू, मेटे, जानकर वेगळी चूल मांडण्याच्या मार्गावर

महायुतीच्या जागावाटपात १३ छोट्या मित्रपक्षांनाही जागा दिल्या जाणार असल्याचे सांगून येत्या १० तारखेपर्यंत जागावाटप करण्यात येईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी जाहीर केले. तसेच जो पक्ष जी जागा जिंकेल त्याला ती जागा देणार असल्याचेही ते म्हणाले. महायुतीमधील बच्चू कडू, महादेव जानकर, ज्योती मेटे यांनी वेगळी चूल मांडण्याचे जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता पसरली अाहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही फटका बसून नये यासाठी एकही घटकपक्ष महायूतीतून बाहेर पडू नये यासाठी भाजपकडून अाटापिटा सुरू असल्याचे अाता दिसून येत अाहे.
लोकसभेत चांगलाच फटका बसल्यानंतर लाडकी बहीण योजना जाहीर करून महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सरू केली. परंतु बदलापूर अत्याचार आणि त्यापाठोपाठ मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महायुती चांगलीच बॅकफूटवर गेली अाहे. इकडे, नुकतेच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याचा दृष्टीने पुढाकार घेतला. त्यामध्ये काही महायुतीतील घटकपक्षांनासुद्धा निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे मुबंईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे २८ आॅगस्ट रोजी बैठकसुद्धा पार पडली, ज्यामध्ये महायुतीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू बैठकीला उपस्थित होते. रासप आणि जनसंग्राम पक्षानेसुद्धा स्वंतत्र भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याने येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम भाजपच्या महायुतीवर होऊ शकतो. त्यामुळे भाजपने सावध भूमिका घेत आता घटकपक्षांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या तयारीत दिसून येत आहे.
मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे जागावाटपाच्या संख्येवरून पुन्हा महायुतीमध्ये वाद सुरू झाला आहे. युतीतील तीन मुख्य पक्षांमध्ये हा वाद सुरू असल्याचेही सूत्रांकडून सांगितले आहे. बावनकुळे यांनी सांगितलेल्या जो जी जागा जिंकेल त्यांना ती जागा दिली जाईल, अशा नवीन पद्धतीने जागावाटपाचा फार्म्युल्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत खदखद वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता येत्या काळात महायुतीमध्ये नेमके कोण सहभागी होणार याकडेही राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आघाडीमध्येही जागावाटपावरून वादाची शक्यता आहे.
महायुतीत आठवलंेच्या रिपाइंसह हे आहेत १३ घटकपक्ष महायुतीतल्या या घटकपक्षांनी घेतली स्वतंत्र भूमिका

​महायुतीच्या जागावाटपात १३ छोट्या मित्रपक्षांनाही जागा दिल्या जाणार असल्याचे सांगून येत्या १० तारखेपर्यंत जागावाटप करण्यात येईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी जाहीर केले. तसेच जो पक्ष जी जागा जिंकेल त्याला ती जागा देणार असल्याचेही ते म्हणाले. महायुतीमधील बच्चू कडू, महादेव जानकर, ज्योती मेटे यांनी वेगळी चूल मांडण्याचे जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता पसरली अाहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही फटका बसून नये यासाठी एकही घटकपक्ष महायूतीतून बाहेर पडू नये यासाठी भाजपकडून अाटापिटा सुरू असल्याचे अाता दिसून येत अाहे.
लोकसभेत चांगलाच फटका बसल्यानंतर लाडकी बहीण योजना जाहीर करून महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सरू केली. परंतु बदलापूर अत्याचार आणि त्यापाठोपाठ मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महायुती चांगलीच बॅकफूटवर गेली अाहे. इकडे, नुकतेच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याचा दृष्टीने पुढाकार घेतला. त्यामध्ये काही महायुतीतील घटकपक्षांनासुद्धा निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे मुबंईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे २८ आॅगस्ट रोजी बैठकसुद्धा पार पडली, ज्यामध्ये महायुतीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू बैठकीला उपस्थित होते. रासप आणि जनसंग्राम पक्षानेसुद्धा स्वंतत्र भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याने येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम भाजपच्या महायुतीवर होऊ शकतो. त्यामुळे भाजपने सावध भूमिका घेत आता घटकपक्षांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या तयारीत दिसून येत आहे.
मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे जागावाटपाच्या संख्येवरून पुन्हा महायुतीमध्ये वाद सुरू झाला आहे. युतीतील तीन मुख्य पक्षांमध्ये हा वाद सुरू असल्याचेही सूत्रांकडून सांगितले आहे. बावनकुळे यांनी सांगितलेल्या जो जी जागा जिंकेल त्यांना ती जागा दिली जाईल, अशा नवीन पद्धतीने जागावाटपाचा फार्म्युल्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत खदखद वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता येत्या काळात महायुतीमध्ये नेमके कोण सहभागी होणार याकडेही राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आघाडीमध्येही जागावाटपावरून वादाची शक्यता आहे.
महायुतीत आठवलंेच्या रिपाइंसह हे आहेत १३ घटकपक्ष महायुतीतल्या या घटकपक्षांनी घेतली स्वतंत्र भूमिका  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment