[ad_1]

​खुपते तिथे गुप्ते​

​खुपते तिथे गुप्ते​

‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये गमतीशीर आठवण सांगताना सई म्हणाली, ‘आम्ही एकदा एका जंगलात शूटिंग करत होतो. जंगलात एक माकड होतं, त्याने माझ्या हातावरचा टॅटू पाहिला. ते माकड आलं आणि मला थेट चावा घेतला. त्यानंतर मी पाच इंजेक्शन्स घेतली. ३ महाराष्ट्रात आणि २ गुजरातमध्ये. मी नंतर कोणत्याही डॉक्टरांना भेटायला जायचे तेव्हा ते एकतर हसायचे किंवा आश्चर्यचकित व्हायचे.’

​मी आणि आई​

​मी आणि आई​

तिच्या आईबद्दल बोलताना सई म्हणाली, “माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यामुळे घरी आम्ही कायम दोघीच होतो. मी आणि आई. बाबा बहुतांशवेळा जहाजावर असायचे. माझ्या आईने मला खूप चांगल्या पद्धतीने वाढवलं. तिने मला वयाच्या १७ व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाठवलं. तिने माझ्यावर विश्वास ठेवला. त्यासाठी मी तिची कायम ऋणी आहे. दहा वर्षांपूर्वी बिकिनी घातल्यावर सईला प्रेक्षकांचा प्रचंड रोष सहन करावा लागला होता. तिने पहिल्यांदाच मराठी चित्रपटांमध्ये बिकिनी घातली होती. ट्रोल झाल्याबद्दल सई म्हणाली, ‘मी नेहमी लोकांचं प्रेम लक्षात ठेवते. मी कधीच ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही.

अंकुशने खडसावलं

अंकुशने खडसावलं

सई म्हणाली, ‘मला गाड्या फार आवडतात. जेव्हा मी माझी पहिली कार खरेदी केली. ती खूप महाग होती. लोकांनी मला त्याबद्दल ऐकवलं आणि मला आधी घर घ्यायला सांगितलं. मी प्रवास करताना माझा जास्त वेळ माझ्या कारमध्ये घालवते, त्यामुळे मला वाटलं की मी चांगली, महागडी गाडी घ्यावी. त्यामुळेच मला गाड्या घ्यायला आवडतात. अंकुश चौधरीने एकदा यासाठी मला खडसावलं होतं, पण मी त्याचं ऐकलं नाही.’ जेवणाबद्दल बोलताना सई म्हणाली, ‘मला जेवणात सांगली स्टाइल पिठलं बनवायला आवडतं. मी सोनालीला आणि तिच्या नवऱ्याला बोलावलं होतं तेव्हा त्यांच्यासाठी चिकन पास्ता बनवला होता.’

​समान वेतन​

​समान वेतन​

गेल्या १५ वर्षांपासून इंडस्ट्रीत समान वेतन मिळत नसल्याने सईने त्यावरही भाष्य केलं. ती म्हणाली, ‘मला वाटतं की लोक महिला कलाकारांपेक्षा पुरुष अभिनेत्यांना अधिक गांभीर्याने घेतात. असं का? मी गेल्या १५ वर्षांपासून उत्तराची वाट पाहत आहे. समान वेतन ही देखील चिंतेची बाब आहे आणि इंडस्ट्रीत भेदभाव का होतो, मला समजत नाही.’ या कार्यक्रमात अवधूतने तिला एका घटनेची आठवण करून दिली जेव्हा सईने अवधूतला त्याच्या टॅटूवरून चिडवलं होतं. त्याबद्दल सईने त्याची माफीही मागितली.

​सई इतकी कणखर कशी​

​सई इतकी कणखर कशी​

सई इतकी कणखर कशी बनली हे सांगताना ती म्हणाली, ‘एक काळ असा होता जेव्हा मला माझ्या घराची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर घ्यावी लागली.त्यानंतर मी स्वतःमधल्या मला शोधू लागले. त्यामुळे मी एवढी कणखर बनले.’ सईने शोमध्ये तिच्या डाएटबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, ‘मी सर्व काही खाते. मी भरपूर भाज्या खाते. मी नॉनव्हेज खात नाही, पण मला सीफूड आवडतं. आजकाल लोक ब्रोकोली, ओट्स आणि इतर पदार्थ खातात, पण मी नाश्त्यात पोहे, उपमा वगैरे खातो. भोपळा आणि कडू भाज्या खातो. जेव्हा मी सुट्टीसाठी भारताबाहेर होते, तेव्हा मला जाणवलं की भारतीय खाद्यपदार्थासारखा कोणताही पदार्थ नाही.”

​ हळव्या बाजू​

​ हळव्या बाजू​

सईने या मुलाखतीत तिच्या हळव्या बाजूही सांगितल्या. वडील गेल्यानंतर आपण पूर्णपणे बदलून गेलो असंही सई म्हणाली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *