घुले-जरांगे यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्क सुरू:व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते जरांगे यांच्याकडून उमेदवारी करणार का? अशी चर्चा
मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या भेटीची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत विविध कार्यक्रमातून दिले आहेत. मागील तीन महिन्यांपासून माजी आमदार नरेंद्र घुले, राजश्री घुले, क्षितिज घुले यांच्यासह स्वतः चंद्रशेखर घुले हे मतदारसंघातील प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. तसेच, मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात छोट्या-मोठ्या मेळाव्याचे आयोजनही घुले कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे. पक्ष, झेंडा व चिन्ह माहित नाही, मात्र विधानसभा निवडणूक लढवायचीच, अशी घोषणा त्यांनी विविध कार्यक्रमातून केली आहे. त्यामुळे घुले हे नेमके भाजप, राष्ट्रवादी की इतर कुठल्या पक्षाकडून लढणार, याची चर्चा सुरू असतानाच, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते जरांगे यांच्याकडून उमेदवारी करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील काही युवक जरांगे पाटलांचा सत्कार करण्यासाठी आंतरवालीत गेले होते. यावेळी ते व्हिडिओ रिल्स बनवत होते. त्यावेळी घुले हे जरांगे पाटील यांची भेट घेऊन दरवाजातून बाहेर येत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसते.