भेटीचे ‘राज’ कारण:विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे – एकनाथ शिंदे यांना वर्षावर भेटले; काय झाली चर्चा?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटी मागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वास्तविक पाकिस्तानी कलाकार फवाद खान या अभिनेत्याचा नवा सिनेमा भारतात प्रदर्शीत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सिनेमाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर देखील राज यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. मनसेने आपल्या काही उमेदवारांची नावे जाहीर करायला देखील सुरुवात केली आहे. विधानसभेला 200 पेक्षा जास्त जागा लागणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आधीच केली आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीनंतर मनसे महायुतीचा एक भाग होईल आणि राज्यातील निवडणुका लढवेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत आपल्या काही उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील 3 ऑगस्ट रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तेव्हा या दोन नेत्यांमध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पोलिस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता या विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती देण्यात आली होती. याचबरोबर राज्यातील विविध प्रश्ना संदर्भात देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. वरळी मतदारसंघासाठी विशेष मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कालच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. त्याआधी वरळी विधानसभा मतदारसंघासाठी मनसेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्याची घोषणा करण्यात आली. मनसे विधानसभा निवडणूकीत या मतदार संघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक या मतदार संघातून उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. त्यामुळे सध्या या मतदारसंघाबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे का? फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळे इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे, अशी मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना धक्का:रोहित पवारांच्या मतदार संघातून प्रा. मधुकर राळेभातांचा भाजप प्रवेश महाराष्ट्रात केवळ मोठे नेतेच पक्ष बदलत नाहीत तर कार्यकर्तेही आपल्या मूळ पक्षापासून फारकत घेऊन इतर पक्षांमध्ये सामील होत आहेत. अलीकडच्या काळात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. आता अहमदनगरमध्ये शरद पवार गटाला जोरदार धक्का बसणार आहे. येथे आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पूर्ण बातमी वाचा…. परतीच्या दिशेने मान्सूनचा प्रवास:जाता जाता दणका देऊन जाण्याचा अंदाज; नांदेड, हिंगोली, परभणी आणि चंद्रपूरला यलो अलर्ट पावसाळा संपला असला तरी आता परतीच्या दिशेने मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. सोमवारपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्ण बातमी वाचा… ‘तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’:निवडणुकीत सत्तांतर होईलच; नंतर ऑडिट करण्याचा ठाकरे गटाचा इशारा आर्थिक शिस्तीच्या बाबतीत दाखवलेल्या अकलेच्या दिवाळखोरीमुळेच मिंध्यांचे सरकार दिवाळखोरीत निघाले आहे. तिजोरीतील खडखडाटाने राज्यातील विविध विकासकामांची तब्बल 36 हजार कोटींची बिले थकली आहेत. महाराष्ट्राची सत्ता जशी ओरबाडून मिळवली त्याच पद्धतीने राज्याची तिजोरी ओरबाडण्याचे कामही अनेक हातांनी सुरू आहे. तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर होईलच; तेव्हा नव्या सरकारला पहिले काम या लुटालुटीच्या ऑडिटचेच करावे लागेल! असा इशाराच उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या माध्यमातून दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…