म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) दिवाळीतील उत्पन्नात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तीन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागील सात दिवसांत ‘पीएमपी’च्या तिजोरीत नऊ कोटी सहा लाख रुपयांची भर पडली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ‘पीएमपी’च्या उत्पन्नात वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत ‘पीएमपी’चे उत्पन्न तीन कोटी रुपयांनी वाढले आहे. ‘पीएमपी’ला २०२१च्या दिवाळीत पाच कोटी ३४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२२ मध्ये ‘पीएमपी’चे दिवाळीतील उत्पन्न सहा कोटी ३५ लाख रुपयांवर गेले.

गर्दीच्या मार्गावर जादा बस

दिवाळीमध्ये गर्दीच्या मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर, कर्वे आणि पौड रस्ता यांसह अन्य मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या. या सात दिवसांत वसुबारस आणि भाऊबीजेला ‘पीएमपी’ला सर्वाधिक उत्पन्न मिळाले. वसुबारस आणि भाऊबीजेच्या दिवशी अनुक्रमे एक कोटी ५६ लाख रुपये आणि एक कोटी ३९ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. लक्ष्मीपूजनाला सायंकाळनंतर वर्दळ कमी झाल्याने सर्वांत कमी ९१ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
काम थांबवावे लागेल; प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन पुणे महापालिकेचा ‘महामेट्रो’ला इशारा
गेल्या सात दिवसांतील उत्पन्न
नऊ नोव्हेंबर ~ १.५६ कोटी
१० नोव्हेंबर ~ १.३१ कोटी
११ नोव्हेंबर ~ १.२६ कोटी
१२ नोव्हेंबर ~ ९१.४० लाख
१३ नोव्हेंबर ~ १.३१ कोटी
१४ नोव्हेंबर ~ १.२८ कोटी
१५ नोव्हेंबर ~ १.३९ कोटी
(स्रोत : ‘पीएमपी’)Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *