अब्दुल वाजेद-सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यानंतर प्रेमीयुगुलाने पंचवटी येथील हॉटेलमध्ये एका रूममध्ये पहाटे पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना गुरूवारी (७ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत युवकाचे नाव ऋषीकेश सुरेश राऊत (वय २४, रा. बीडकीन), युवतीचे नाव दिपाली अशोक मरकड (वय २०, रा. ढाकेफळ, ता. पैठण) असे आहेत.

या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी हॉटेल येथून सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान हॉटेलची ३०५ नंबरची रूम उघडत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी व त्यांचे सहकारी हे पंचवटी हॉटेलमध्ये पोहोचले. या वेळी तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सकाळी रूम सफाई करण्यासाठी दिपाली आणि ऋषीकेश हे थांबलेल्या रूमची बेल वाजवली. रूममधून प्रतिसाद येत नव्हता. यानंतर हॉटेलच्या रिसेप्शनवरून ऋषीकेश आणि दिपालीच्या मोबाईलवर कॉल केला असता, त्यांचाही प्रतिसाद नव्हता, अशी माहिती दिली. यानंतर या रूममध्ये ऋषीकेश आणि दिपाली या दोघांनीही पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

आमदार, खासदारांनी साथ सोडली, शरद पवारांनी आखली मोठी रणनीती; मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक

या दोघांना पोलीस कर्मचारी सोनवणे आणि गुजर यांनी तत्काळ घाटी रूग्णालयात उपचारासाठी पाठवले. घाटीच्या डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणाची नोंद वेदांतनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक कैलास जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दोघांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा होता विरोध

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाकेफळ येथे राहणारी दिपाली बीए प्रथम वर्षात शिकत होती. ती तिच्या बीडकीन येथे राहणाऱ्या मामाकडे राहत होती, तर ऋषीकश हा उच्च शिक्षित असून तो ग्राफिक्स व डिजिटल बॅनर तयार करण्याचा व्यवसाय करत होता. दोघेही एकाच गल्लीत राहत असल्याने, त्यांची ओळख झाली. यानंतर दोघे प्रेमात पडले. या दोघांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला. या विरोधानंतर मंगळवारी दुचाकीने हे दोघे जण बीडकीनहून शहरात आले आणि रात्री पंचवटी हॉटेल मध्ये थांबले होते. मात्र तिथेच त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *