मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण!:मराठा नेताच गेला जरांगेंच्या विरोधात, आठ दिवसांचा दिला वेळ
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आहे. राज्यभरात जरांगे पाटील यांना मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारला देखील चांगलेच कोंडीत पकडले होते. आता या आरक्षणाच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले, मात्र मराठा समाजाच्या हाती काहीच लागले नसल्याची भावना त्यांनी नुकतीच अंतरवाली सराटी येथे व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यातच आता जरांगे पाटील यांच्याच विरोधातच एकाने उपोषण सुरू केले आहे. बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? असा सवाल अण्णासाहेब शिंदे यांनी उपस्थित केला आहे. याच सोबत त्यांनी इतरही प्रश्न उपस्थित केले असून आठ दिवसात याचे उत्तर न दिल्यास मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अण्णासाहेब शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा. देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. पुढच्या आठ दिवसात या प्रश्नांचे निरसन न केल्यास बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी केला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात तसेच या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.