Payal Naik | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Sep 2023, 11:05 am

Akshay Kumar Birthday: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपाटात काम केलं मात्र त्याचं नाव अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं.

ravina tandon to shilpa shetty akshay kumar 7 big affaires with actresses
एक दोन नाही तब्बल ७ अभिनेत्रींशी अफेअर; दोघींसोबत तर रंगे हात पकडला गेलेला अक्षय कुमार, लग्नाचं वचन देऊन…
मुंबई– बॉलिवूडचा खिलाडी असणारा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार हे इंडस्ट्रीमधील खूप मोठं नाव आहे. त्याने ‘हेर फेरी’, ‘वेलकम’ , ‘भूलभुलैया’, ‘ऐतराज’ सारख्या अनेक हिट चित्रपटात काम केलं. यासोबतच तो ‘बेबी’, ‘पॅडमॅन’, ‘मिशन मंगल’, ‘टॉयलेट’ अशा अनेक चित्रपटात दिसला. त्याच्या हिट सिनेमाची यादी जितकी मोठी आहे तितकीच त्याच्या फ्लॉप सिनेमांची यादीही मोठी आहे. आज ९ सप्टेंबर रोजी तो त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. दिल्लीत एका सर्वसाधारण घरात जन्मलेल्या अक्षयने प्रत्येकाला खिलाडी या शब्दाचं वेड लावलं. मात्र जेवढं त्याचं करिअर मोठं होतं तेवढीच त्याची अफेअर्सची लिस्टही मोठी आहे. गेल्या कित्येक वर्षात त्याचं नाव बॉलिवूमधील अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. दोघींसोबत तर तिसऱ्या गर्लफ्रेंडने त्याला रंगे हात पकडलं होतं.

रवीना टंडन

रवीना टंडन

बॉलिवूडमधली सगळ्यात जास्त गाजलेली जोडी म्हणजे रवीना टंडन आणि अक्षय कुमार. ‘मोहरा’ चित्रपटाच्या सेटवर त्यांचं सूत जुळलं. त्यांनी काही वर्ष एकमेकांना डेटही केलं मात्र काही वर्षांनी अक्षय त्याच्या दुसऱ्या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत नात्यात असल्याचं रवीनाला समजलं. रवीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की माझ्यासाठी नात्यातला प्रामाणिकपणा खूप महत्वाचा होता. पण त्याच्यालेखी माझी किंमत काहीच नव्हती. मी असण्यानसण्याने त्याला काहीच फरक पडत नव्हता.

रेखा

रेखा

बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि अक्षय यांच्या नात्यावरून तेव्हा प्रचंड गदारोळ झाला होता. ‘खिलाडीयो का खिलाडी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचं फोटोशूटही प्रचंड चर्चेत होतं. त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. त्या दोघांनीही यावर कधीही भाष्य केलं नाही. मात्र रवीनाने त्यांच्यात असं काहीही नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हा अक्षय रवीनासोबत रिलेशनमध्ये होता.आणि रेखा स्वतःहून अक्षयच्या मागे लागल्या होत्या असं रवीनाने सांगितलं होतं.

सुष्मिता सेन

सुष्मिता सेन

मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या बिजनेसमॅन ललित मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र तिचं नावही कधीकाळी अक्षयसोबत जोडलं गेलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रवीना टंडनने त्यांना रूममध्ये रंगे हात पकडलं होतं. एका मुलाखतीत रवीना म्हणालेली की तिने अक्षयला रेखा आणि सुष्मिता यांच्यासोबत रंगे हात पकडलं होतं. ते पाहून रवीनाला फार वाईट वाटलं होतं. त्यानंतर तिने अक्षयसोबत नातं तोडण्याचा निर्णय घेतला.

पूजा बत्रा

पूजा बत्रा

खिलाडी कुमारचं हे असं रिलेशनशिप होतं ज्याबद्दल फारसं कुणाला ठाऊक नाहीये. अक्षय आणि अभिनेत्री पूजा बत्रा तेव्हा नात्यात होते जेव्हा अक्षय इंडस्ट्रीत नवीन होता. तो इंडस्ट्रीत आला नव्हता तेव्हा तेव्हापासून ते नात्यात होते. मॉडेलिंगच्या दिवसात ते प्रेमात होते. त्यानंतर दोघांनीही इंडस्ट्रीत प्रवेश आणि अक्षयला प्रचंड लोकप्रियता मिळाली मात्र पूजा म्हणावी तशी लोकप्रिय होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांचं नातं तिथेच संपलं.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी

‘धडकन’ चित्रपटात एकत्र झळकणारे शिल्पा आणि अक्षय हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिलं गेलेलं कपल. त्यांनी ऑनस्क्रीन तर चाहत्यांना वेड लावलंच मात्र ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत होते. शिल्पा आणि अक्षय ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात होते. मात्र तेव्हा अक्षय त्याचवेळी ट्विन्कल खन्नालाही डेट करत असल्याचं शिल्पाला समजलं. तेव्हा तिने आपली फसवणूक करणाऱ्या अक्षयपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अक्षय शिल्पाची फसवणूक करत होता.

आयेशा झुल्का

आयेशा झुल्का

‘खिलाडी’ या चित्रपटामुळे सुरू झालेली अभिनेत्री आयेशा झुल्का आणि अक्षय कुमारची लव्हस्टोरी. त्यांचा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. मात्र काही कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यांच्या नात्याबद्दलही फार कुणाला ठाऊक नाही. मात्र त्यांचं नातं तेव्हा खूप चर्चेत होतं. त्यानंतर अक्षय रवीनाच्या प्रेमात पडला. काही वर्षांनी त्याने रवीनाची देखील फसवणूक केली.

​प्रियांका चोप्रा​

​प्रियांका चोप्रा​

अक्षयच्या अफेअर्सची चर्चा आणि प्रियांका चोप्राचं नाव येणार नाही असं फार क्वचित पाहायला मिळतं. लग्नानंतर अक्षय प्रियांकासोबत नात्यात होता. त्यानी अनेक चित्रपट एकत्र केले. त्यादरम्यान ते नात्यात होते. त्यांच्या एकत्र असण्याच्या चाहत्यांमध्ये बऱ्याच चर्चा होत्या. मात्र अक्षय आधीच विवाहीत होता. त्यांच्या नात्याबद्दल ट्वींकल खन्नाला माहीत पडलं आणि तिने अक्षयला प्रियांकासोबत काम न करण्याची तंबी दिली. त्यानंतर ते दोघे कधीही एकत्र दिसले नाहीत.

काजोल

काजोल

तर दुसरीकडे अभिनेत्री काजोलने एका मुलाखतीत आपल्याला अक्षय कुमार आवडत असल्याचं म्हटलं होतं. तो आपला क्रश असल्याचं तिने मान्य केलं होतं.

Payal Naik यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *