मुंबई : एक खेळाडू सामना कसा एकहाती फिरवू शकतो, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने दाखवून दिला. ऑस्ट्रेलियाची ५ बाद ६९ अशी दयनीय अवस्था होती. पण त्यानंतर मॅक्सवेलने धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानवर दमदार विजय साकारता आला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मॅक्सवेलने या सामन्यात २०१ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.

मॅक्सवेलला क्रॅम्पमुळे उभेही राहता येत नव्हते. पण तरीही त्याने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि एकाहती सामना कसा जिंकवला जाऊ शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ दाखवला. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाने त्याच्यापुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेलला दुखापत झाली होती. पण एकाच जागेवर उभा राहून त्याने जी फटकेबाजी केली त्याला तोड नव्हती. त्यामुळे मॅक्सवेलचे कौतुक करावे तेवढे थोडे होते. कारण नवव्या क्रमांकाच खेळाडूला घेऊन तो खेळला आणि ऑस्ट्रेलियाला सामना जिंकवण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. या विजयासह ऑस्ट्रेलियाचे १२ गुण झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने आता या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

अफगाणिस्तानने या सामन्यात सर्वस्व पणाला लावले होते. कारण या सामन्यात त्यांची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. अफगाणिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इतिहास रचलाा. कारण अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झारदान संपूर्ण ५० षटके मैदानात उभा राहीला आणि त्याने शतक रचले. आतापर्यंत अफगाणिस्तानच्या एकाही खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये कधीच शतक झळकावता आले नव्हते. पण हे झारदानने करून दाखवले आणि त्यामुळे या सामन्यात इतिहार रचला गेला. झारदानच्या या १२९ धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने २९१ धावांचा डोंगर रचला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २९२ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकामागून एक बाद होत राहीले.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ ६९ धावांतच तंबूत परतला होता. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाला धक्के बसत गेले. पण यावेळी अफगाणिस्तानच्या विजयात ग्लेन मॅक्सवेलचा मोठा अडसर होता. मॅक्सवेलने यावेळी अफगाणिस्तानचा चांगलाच घाम काढला. त्यामुळे हा सामना फिरल्याचे पाहायला मिळाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *