जालना: मला अनेक फोन आणि मेसेज आले होते. पण मुख्यमंत्री असलो तरी प्रोटोकॉल बाजुला सारुन मनोज जरांगे पाटील यांना भेटायचचं, हे मी ठरवले होते. मराठा समाजाला आपला अधिकार मिळालचा पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, ते मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते गुरुवारी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सांगता; एकनाथ शिंदे कोंडी फोडण्यात यशस्वी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मनोज जरांगे यांच्या वडिलांना उद्देशून केली. त्यांनी जरांगे-पाटलांच्या वडिलांना म्हटले की, तुझा पोरगा भारी आहे. स्वत:साठी नाही समाजासाठी लढतोय. मनोजला मी अनेक वर्षे ओळखत आहे. त्याने वैयक्तिक फायद्यासाठी कोणता प्रश्न मांडला नाही. जेव्हा जेव्हा मला भेटला तेव्हा मराठा आरक्षणाबद्दल त्याने सरळ भूमिका मांडली. मी मनोजला मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण एखादं आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं आणि जिद्दीने आणि चिकाटीने ते पुढे नेणं, ही सोपी गोष्ट नाही. एखाद्या आंदोलनाला महाराष्ट्रात अशाप्रकारचा प्रतिसाद मिळणे, ही गोष्ट खूप कमीवेळा पाहायला मिळते. पण ज्यांचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असतो, त्यांच्या पाठिशी जनता उभी राहतेच. मी भेटायला आल्यानंतर मनोज जरांगे यांनी माझ्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेतले, यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

हा विश्वासघात झाला… ‘बोलून मोकळं व्हायचं’वेळी फडणवीसांशी काय बोलणं झालं? शिंदेंनी सगळंच सांगितलं

मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचं भाष्य

यावेळी एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारासंदर्भात भाष्य केले. लाठीमाराची घटना ही दुर्दैवी होती. स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. मी त्या बैठकीत खंत आणि संवेदना व्यक्त केली. मराठा समाज हा शिस्तप्रिय आणि संवेदनशील आहे. यापूर्वी मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे शांततेत काढले. लाठीमाराच्या घटनेत ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दोष होता त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. तसे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मी दिले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *