आंतरवालीतील उपोषणाचा चौथा दिवस:मनोज जरांगेंची तब्येत खालावली, देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोगचे ग्रामस्थ उपोषणाला बसणार

आंतरवालीतील उपोषणाचा चौथा दिवस:मनोज जरांगेंची तब्येत खालावली, देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोगचे ग्रामस्थ उपोषणाला बसणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे 25 जानेवारीपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ आंतरवाली सराटी येथील उपोषणात सहभागी होणार आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगेंच्या मागणीवर तोडगा काढून हे उपोषण लवकरात लवकर सोडवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग येथील ग्रामस्थ आज मंगळवारी आंतरवाली सराटी येथे उपोषणात सहभागी होणार आहेत. याबाबत धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. वैभवी देशमुख उपोषणात होणार सहभागी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहेत. मी कालच मागणी केली आहे सरकार शिष्टमंडळ पाठवावे. सरकारने उपोषण गांभीर्याने घेतले पाहिजे. लवकरात लवकर शिष्ट मंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे. आज उपोषणात वैभवी सहभागी होणार आहे आईची तब्येत ठीक असेल तर आई पण सहभाग घेणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे पुरावे दिलेले आहेत
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे दिलेले आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी तशी यंत्रणा राबवली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही आपली मागणी असून त्यावर आम्ही ठाम आहोत. बाकीचे निर्णय घेण्याचे काम त्यांचे आहे. जे काही पुरावे दिले आहेत, त्यावर चर्चा होईल, ते जे निर्णय घेतील ते समोर येईल आणि ते सगळ्यांना मान्य करावे लागेल, असेही धनंजय देशमुख म्हणाले. …तर यंत्रणेवरील दबाव कमी होईल
धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतही प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, तर यंत्रणेवरील दबाव तर शंभर टक्के कमी होणार असल्याचा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला. मागच्या ज्या दहा दिवसातील घडामोडी आहेत, व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप यावर गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या गोष्टी घडल्या, त्या परत नाही घडल्या पाहिजे, त्यामुळे यावर निश्चित दबाव कमी होईल, असे देशमुख म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment