Joe Root 27th Test Century: मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सलग दोन शतके झळकावून संघाची स्थिती मजबूत केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या ५५३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ बाद ४७३ धावा केल्या आहेत. ओली पोपच्या शतकी खेळीनंतर माजी कर्णधार रुटने २५ चौकारांच्या मदतीने नाबाद १६३ धावा केल्या आहेत. रूटशिवाय ऑली पोपनेही शतक झळकावले आणि १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४५ धावांची खेळी करत ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. दरम्यान रूटच्या शतकाने माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाला धोका निर्माण झाला आहे.

वाचा – न्यूझीलंडला मिळणार नवीन कसोटी कर्णधार; ‘हा’ धुरंधर केन विल्यमसनला करेल रिप्लेस

जो रूट कोहली-स्मिथसाठी धोका
फॅब ४ बद्दल बोलायचे झाले तर या कसोटीपूर्वी विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ २७-२७ कसोटी शतकांसह अव्वल स्थानावर होते, परंतु आता या शतकासह रूटने त्यांची बरोबरी केली आहे. ११९ व्या सामन्यातील रुटचे हे २७ वे शतक ठरले आहे. इंग्लंडचा हा माजी कर्णधार गेल्या दोन वर्षापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. अशा परिस्थितीत रूटचा फॉर्म पाहता या मालिकेतून तो कोहली आणि स्मिथच्या पुढे बाजी मारेल अशी अपेक्षा केली जात आहे.

वाचा – असं कुठवर चालणार; रोहित शर्मा नसेल तर तुम्ही जिंकणार नाही का?

२०२१ पासून रूटची १० शतके
१ जानेवारी २०२१ पासून जो रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १० शतके झळकावली आहेत. या दोन वर्षांत फॅब ४ मधील खेळाडूंनी ठोकलेली ही सर्वाधिक शतके आहेत. उल्लेखनीय आहे की रुटने या काळात ६ वेळा १५० धावांचा टप्पा ओलांडताना दोन द्विशतकेही झळकावली. इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करताना रूटने आपला खतरनाक फॉर्म कायम ठेवला आहे.

इंग्लंड मजबूत स्थितीत
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ फक्त 80 धावांनी मागे आहे. अशा परिस्थितीत आता चौथ्या दिवशी यजमान संघाच्या नजरा वेगवान खेळ करून किवी संघावर धार मिळवण्यावर असेल. चौथ्या दिवशी इंग्लंडने २५०-३०० धावांची आघाडी घेतल्यास सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे, अन्यथा सामान्य अनिर्णित निकालाकडे पुढे जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड सध्या १-० ने आघाडीवर आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.