इंग्लंड पहिल्या डावात 499 धावांवर सर्वबाद:चहाच्या ब्रेकवर न्यूझीलंडची धावसंख्या 62/2; केन विल्यमसनने 9 हजार कसोटी धावा पूर्ण केल्या
न्यूझीलंडविरुद्धच्या क्राइस्टचर्च कसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडने 151 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लिश संघ पहिल्या डावात 499 धावांत सर्वबाद झाला होता, तर न्यूझीलंडने 348 धावा केल्या होत्या. सध्या इंग्लिश संघ 89 धावांनी आघाडीवर आहे. टी-ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 2 बाद 62 धावा केल्या आहेत. केन विल्यमसन 26 आणि रचिन रवींद्र 23 धावांवर नाबाद आहे. विल्यमसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 9 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कर्णधार टॉम लॅथम आणि डवान कॉनवे 8 धावा करून बाद झाले. न्यूझीलंडने दिवसाची सुरुवात 319/5 अशी केली. हॅरी ब्रूकने 132 धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्सने वैयक्तिक 37 धावा करून खेळायला सुरुवात केली. इंग्लंड 499 धावांवर ऑलआऊट, हॅरी ब्रूकने 171 धावा केल्या
लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड संघाने 8 विकेट गमावत 459 धावा केल्या होत्या. यामध्ये हॅरी ब्रूक 171 धावा करून बाद झाला. त्याला मॅट हेन्रीने यष्टिरक्षक टॉम ब्लेंडलच्या हाती झेलबाद केले. कर्णधार बेन स्टोक्सने 80 धावा केल्या, तर गॉस ऍटकिन्सनने 48 आणि ब्रायडन केसने नाबाद 33 धावा केल्या. मॅट हेन्रीने 4 बळी घेतले. नॅथन स्मिथने 3 बळी घेतले. टीम साऊदीने 2 बळी घेतले.