मुंबई: शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील इतर विभागांप्रमाणेच कोकणातील राजकीय वर्तुळात मोठे बदल होताना दिसत आहेत. कोकणात प्रामुख्याने नारायण राणे विरुद्ध शिवसेना असे चित्र असताना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही कोकणात पूर्ण जोर लावला असून आता राज ठाकरेंची मनसेनेही मुसंडी मारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी कोकण दौरा जाहीर केला असून त्यांच्या या दौऱ्याच्या घोषणेमुळे कोकणातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे घेणार कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २९ नोव्हेंबरला कोल्हापूरसह कोकणाच्या दौऱ्यावर निघत आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याची आखणी करण्यात आली असून प्रथम ते कोल्हापूरला भेट देणार आहेत. मंगळवारी ९ नोव्हेंबर रोजी ते कोल्हापूर शासकीय विश्रामगृहात शहर आणि जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी बुधवारी ते कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते गुरुवारी, १ डिसेंबर रोजी कोकण दौऱ्यावर रवाना होतील.

क्लिक करा आणि वाचा- वारंवार अपघात होणाऱ्या नवले ब्रिजवर लागले हटके बॅनर, सोशल मीडियावर झाले व्हायरल

आंगणेवाडीच्या भराडी देवीचेही घेणार दर्शन

राज ठाकरे हे १ डिसेंबर रोजी मालवण तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. २ डिसेंबर रोजी आंगणेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे कणकवली तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. तसेच ३ डिसेंबर रोजी ते मुंबई गोवा हायवेवरील राजापूर कार्यालयाचे उद्घाटन करतील. येथे राजापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या दिवशी २०० महिलांचा मनसेत प्रवेशही होणार आहे. त्यानंतर ते लांजा बाजारपेठेत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

रविवारी ४ डिसेंबर रोजी राज ठाकरे रत्नागिरीत विधानसभा कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते पदाधिकाऱ्याची बैठक घेणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- भावना गवळी आक्रमक; खासदार विनायक राऊतांसह आमदार नितीन देशमुखांवर अकोल्यात गुन्हे दाखल

सोमवारी ५ डिसेंबर रोजी राज ठाकरे गुहागर तालुका कार्यालयाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. तसेच चिपळूण विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आणि खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी ते दापोली आणि मंडणगडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील.

राज ठाकरे कोणाच्या भेटी घेणार?

आपल्या कोकण दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतर कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

क्लिक करा आणि वाचा- घरगुती भांडणाचं पर्यवसन हत्याकांडात; अकोल्यात पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्राची हत्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *