[ad_1]

नवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम सुरू होताच पेन्शन खातेधारकांना सरकारने मोठे दिवाळी गिफ्ट दिले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत पेन्शन खात्यावरील व्याज आता पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होऊ लागले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यांमध्ये व्याज जमा करण्यास सुरुवात केल्यास अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी पीएफ खात्यातील गुंतवणुकीवर ८.१५% व्याजदर निश्चित केला असून काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम आधीच जमा झाली आहे. तथापि, खात्यांमध्ये व्याजाची रक्कम दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

EPFO: नोकरी बदलली असेल तर त्वरित स्वत: करा ‘हे’ काम, नाहीतर अडकतील पीएफचे पैसे
पीएफ खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. जेव्हा व्याज जमा केले जाईल तेव्हा संपूर्ण व्याज खात्यात क्रेडिट केले जाईल. ईपीएफओने कर्मचाऱ्यांना संयम बाळगण्यास सांगितले असताना ईपीएफओनुसार व्याजात कोणतीही कपात होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

PF Update: कर्मचाऱ्यांनो, अजिबात हरवू नका ‘हा’ नंबर, अन्यथा पेन्शन थांबेल, लाइफ सर्टिफिकेटही जमा होणार नाही
करोडो पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा
केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीच २४ कोटींहून अधिक खात्यांमध्ये व्याज जमा करण्यात आले असून एकदा व्याज जमा झाल्यास ते सदस्यांच्या पीएफ खात्यात दिसून येईल. त्यांनी सांगितले की कोणतीही व्यक्ती भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक – टेक्स्ट मेसेज, मिस्ड कॉल, उमंग ॲप आणि EPFO वेबसाइट यांसारख्या अनेक प्रकारे तपासू शकते.

Read Latest Business News

EPF सदस्याचा अचानक मृत्यू झाल्यास नॉमिनीचे नाव नसले तरीही करता येतो क्लेम, जाणून घ्या कसं
पीएफचा व्याजदर कसा ठरतो
पीएफचा व्याजदर दरवर्षी अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत करून ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) द्वारे ठरवले जाते. यावर्षी ईपीएफओने जुलैमध्ये व्याजदर जाहीर केला होता. गेल्या वर्षी, ईपीएफओने आपल्या ग्राहकांसाठी व्याजदर ८.५% वरून २०२०-२१ मध्ये ८.१०% पर्यंत चार दशकांच्या नीचांकी पातळीपर्यंत कमी केला होता जो १९७७-७८ नंतर हा सर्वात कमी होता, जेव्हा पेन्शन व्याजदर ८% होता. ईपीएफ खात्यावरील व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते परंतु, वार्षिक आधारावर सदस्यांच्या खात्यात जमा केले जाते. तर जमा होणारी व्याजाची रक्कम चक्रवाढनुसार वाढते, जी पुढील महिन्याच्या शिलकीत जोडली जाते.

ईपीएफओ शिल्लक ऑनलाइन कशी तपासायची

  • EPFO च्या पोर्टलला https://www.epfindia.gov.in/site_en/For_Employees.php येथे भेट द्या
  • मुख्यपृष्ठावर, ‘सेवा’ वर क्लिक करा आणि ड्रॉपडाउन सूचीमधून ‘कर्मचाऱ्यांसाठी’ निवडा.
  • ‘सदस्य पासबुक’ लिंकवर क्लिक करा आणि ते लॉग इन पृष्ठावर नेईल.
  • तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), पासवर्ड आणि कॅप्चा वापरून खात्यात लॉग इन करा.
  • तुम्ही तुमचे खाते तपशील आणि EPF शिल्लक तुमच्या समोर येईल.

एसएमएसद्वारे EPFO शिल्लक तपासा
तुम्ही तुमचा UAN क्रमांक वापरून एसएमएसद्वारे पेन्शन खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता. खात्यातील शिल्लक तपशील इंग्रजीमध्ये प्राप्त करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ७७३८२९९८९९ वर “EPFOHO UAN ENG” लिहून पाठवा. ही सेवा आता इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *