प्रत्येक अग्निवीराला पेन्शन असलेली नोकरी – गृहमंत्री:हरियाणाच्या प्रचारसभेत अमित शाहांचे आश्वासन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी हरियाणात तीन प्रचारसभा घेतल्या. ते म्हणाले, ‘लष्करात भरती होणाऱ्या प्रत्येक अग्निवीराला आम्ही पेन्शन असलेली नोकरी देऊ. मोदींनी हरियाणातच वन रँक-वन पेन्शनचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले. राहुलबाबा जम्मू-काश्मिरात आश्वासन देऊन आले की, कलम ३७० पुन्हा लागू करणार. तुम्हीच काय, तुमची तिसरी पिढीही ३७० लागू करू शकणार नाही, हे माझे राहुलबाबांना थेट आव्हान आहे.
ब्रह्मोस एअरोस्पेस अग्निवीरांना आरक्षण देईल भारत-रशियाची संयुक्त कंपनी ब्रह्मोस एअरोस्पेस माजी अग्निवीरांना नोकरीत आरक्षण देईल. कंपनी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनवते. असे आरक्षण देणारी ही संरक्षण क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. तांत्रिक-सामान्य प्रशासन १५%, प्रशासन व सुरक्षेत ५०% नोकऱ्या अग्निवीरांना दिल्या जातील.