शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये:आणखी एका पुतळ्यावरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल; पवार, राणेंवरही टीका

शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये:आणखी एका पुतळ्यावरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल; पवार, राणेंवरही टीका

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रत्येक जण हा भारतीय जनता पक्षाचा प्रोडक्ट असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मुंबईत देखील शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावरील पुतळा झाकून ठेवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मालवण येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील आरोपी हा वर्षा बंगल्यावर लपून बसला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. लाडक्या उद्योगपतींनी शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मालवण येथील शिवरायांच्या पुतळा प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही ताब्यात नसल्याबद्दल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. इतकेच नाही तर मुंबई विमानतळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी अदानी समूहावर देखील पुन्हा निशाणा साधला. मालवणमधील एक प्रकरण अद्याप शांत झालेले नसताना मुंबईतील हे दुसरे प्रकरण समोर आल्याने सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचे राजकारणात काहीच कर्तुत्व नाही स्वतःचे कर्तृत्व नसताना केवळ मोदी आणि शहा यांच्या ताकतीचा वापर करून स्वतःच्या काकाचा पक्ष आणि चिन्ह पळवले. त्यांनी मर्दानगीची भाष करु नये, असे आव्हान संजय राऊत यांनी अजित पवार यांना दिले आहे. हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढा, निवडणूक चिन्ह तयार करा, असे आव्हान देखील त्यांनी दिले. जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणात आहेत, त्यांच्या तोंडी मर्दानगीची भाषा शोभत नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आमदार नितेश राणे यांच्यावर हल्ला भाजपचा एक आमदार त्यांचे वडील आधी शिवसेनेमध्ये होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. हे लोक आता हिंदुत्ववादी झाले आहेत. मशिदीमध्ये घुसून हल्ला करण्याची भाषा हे आमदार करत आहेत. नरेंद्र मोदी यांना माझे आवाहन आहे की, या प्रकारची भाषा त्यांना मंजूर आहे का? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी नाव न घेता आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. ही विचारसरणी किंवा अशी भाषा नरेंद्र मोदी यांना मान्य असेल तर त्यांनी विदेशात जाऊन मशिदीत जाणे सोडून द्यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी यांनी केले आहे. दुबई सौदी अरेबिया येथील मशिदीमध्ये जाऊन नरेंद्र मोदी एकतेचे पाठ सांगणे सोडून द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी दिले आहे. मशिदीमध्ये घुसून मारण्याची भाषा कोणी वापरत असेल तर सरकार काय करत आहे? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. तसे असेल तर आधी पाकिस्तान मध्ये घुसा आणि आतंकवाद्यांच्या विरोधात युद्ध लढा, असे आव्हान देखील त्यांनी नाव न घेता नितेश राणे यांना दिले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मनोज जरांगे पाटील यांची मोर्चेबांधणीला सुरुवात:विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी पुण्यात महत्त्वाची बैठक विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ते आज 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली. पूर्ण बातमी वाचा… महामहोपाध्याय फडणवीसकृत शिवरायांचा नवा अपमान:थेट हल्ला करत ठाकरे गटाकडून फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रत्येक जण हा भारतीय जनता पक्षाचा प्रोडक्ट असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मुंबईत देखील शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावरील पुतळा झाकून ठेवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मालवण येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील आरोपी हा वर्षा बंगल्यावर लपून बसला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. लाडक्या उद्योगपतींनी शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान केला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मालवण येथील शिवरायांच्या पुतळा प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही ताब्यात नसल्याबद्दल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. इतकेच नाही तर मुंबई विमानतळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी अदानी समूहावर देखील पुन्हा निशाणा साधला. मालवणमधील एक प्रकरण अद्याप शांत झालेले नसताना मुंबईतील हे दुसरे प्रकरण समोर आल्याने सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचे राजकारणात काहीच कर्तुत्व नाही स्वतःचे कर्तृत्व नसताना केवळ मोदी आणि शहा यांच्या ताकतीचा वापर करून स्वतःच्या काकाचा पक्ष आणि चिन्ह पळवले. त्यांनी मर्दानगीची भाष करु नये, असे आव्हान संजय राऊत यांनी अजित पवार यांना दिले आहे. हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढा, निवडणूक चिन्ह तयार करा, असे आव्हान देखील त्यांनी दिले. जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणात आहेत, त्यांच्या तोंडी मर्दानगीची भाषा शोभत नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आमदार नितेश राणे यांच्यावर हल्ला भाजपचा एक आमदार त्यांचे वडील आधी शिवसेनेमध्ये होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. हे लोक आता हिंदुत्ववादी झाले आहेत. मशिदीमध्ये घुसून हल्ला करण्याची भाषा हे आमदार करत आहेत. नरेंद्र मोदी यांना माझे आवाहन आहे की, या प्रकारची भाषा त्यांना मंजूर आहे का? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी नाव न घेता आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. ही विचारसरणी किंवा अशी भाषा नरेंद्र मोदी यांना मान्य असेल तर त्यांनी विदेशात जाऊन मशिदीत जाणे सोडून द्यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी यांनी केले आहे. दुबई सौदी अरेबिया येथील मशिदीमध्ये जाऊन नरेंद्र मोदी एकतेचे पाठ सांगणे सोडून द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी दिले आहे. मशिदीमध्ये घुसून मारण्याची भाषा कोणी वापरत असेल तर सरकार काय करत आहे? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. तसे असेल तर आधी पाकिस्तान मध्ये घुसा आणि आतंकवाद्यांच्या विरोधात युद्ध लढा, असे आव्हान देखील त्यांनी नाव न घेता नितेश राणे यांना दिले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मनोज जरांगे पाटील यांची मोर्चेबांधणीला सुरुवात:विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी पुण्यात महत्त्वाची बैठक विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ते आज 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली. पूर्ण बातमी वाचा… महामहोपाध्याय फडणवीसकृत शिवरायांचा नवा अपमान:थेट हल्ला करत ठाकरे गटाकडून फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment