महाराष्ट्राचा नवा कारभारी आज ठरणार?:फडणवीस दिल्लीला रवाना, बंगल्याबाहेर ‘सदैव मुख्यमंत्री’चे पोस्टर; राजधानीत NCP ची बैठक
आज महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते. त्यासाठी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तूर्त पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे मानले जात आहे. मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोहोचलेत. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याच्या बाहेर फडणवीस यांना महाराष्ट्राचे सदैव मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत. बॅनरवर फडणवीस शपथ घेताना दिसून येत आहेत.