फडणवीस खरे शिवभक्त असतील तर केसरकरांना मंत्रालयासमोर जोडे मारतील:मालवण मधील घटनेवरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल

फडणवीस खरे शिवभक्त असतील तर केसरकरांना मंत्रालयासमोर जोडे मारतील:मालवण मधील घटनेवरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल

मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याचा केवळ निषेध करून ही फाईल बंद करता येणार नाही. या कामामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशांमध्ये इतके पुतळे उभे आहेत, समुद्रात, पाण्यात पुतळे उभे आहेत. मात्र ते कोसळले नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे खरे शिवभक्त असतील तर ते दीपक केसरकर यांना मंत्रालयाच्या समोर जोडे मारतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. मालवण मधील पुतळ्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये ठाणे कनेक्शन आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव यातून पुढे येत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मिंदे सरकार भ्रष्टाचार करते आणि आता याच पैशातून तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक लढणार आहात, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मनाला झालेली सगळ्यात मोठी जखम असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, हे बरे झाले. यातून काहीतरी चांगले घडेल असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. यावर देखील संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. बरे झाले ही घाण आमच्याकडून गेली, अशा विचारांची माणसे आमच्यात नाहीत हे बरे झाले, असे म्हणत संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मिंद्यांनी पोसलेली ही औरंगजेबाची अवलाद असल्याची टीका देखील राऊत यांनी आहे. मात्र, हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचे पाप असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मिंदे आणि त्यांच्या टोळीला पोसण्याचे काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. नारायण राणे यांनी रस्त्यावर उतरायला हवे खरा शिवभक्त असेल तर खासदार नारायण राणे यांनी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरायला हवे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात देखील भ्रष्ट्राचार केला आहे. त्याचा राणे यांनी निषेध करायला हवा, ज्यांनी पैसे खाल्ले आहेत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी देखील राणे यांनी केली पाहिजे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या प्रकरणी कंत्राटदार आणि शिल्पकार हे सापडत नाहीत. ते दोघे पळून गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ते कोठे आहेत? असा प्रश्न विचारायला हवा. असे म्हणत राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… संतापजनक घटना:55 वर्षीय पित्याकडून 16 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार; आईच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत मुलींच्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूर मधील परिस्थिती सामान्य होत असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील त्याच बदलापूर मध्ये पोलिसांनी मंगळवारी एका 55 वर्षीय व्यक्तीला आपल्या 16 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुलीची आई जेव्हा कामादरम्यान रात्रीच्या शिफ्टला जात होती, तेव्हा आरोपी मुलीला टार्गेट करत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पूर्ण बातमी वाचा… ‘मातोश्री’ वर आघाडीची तातडीची बैठक:पुढील आंदोलनाची रणनीती तसेच जागा वाटपाची चर्चा होणार; ठाकरे, पवार, पटोलेंची उपस्थिती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात महिला व बाल अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. रत्नागिरी येथील घटना देखील आता ताजीच आहे. तसेच पुण्यात देखील गुंडांनी पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील पुढील दिशा ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला शरद पवार, नाना पटोले यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पूर्ण बातमी वाचा… सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ:तरी तुम्हाला जावेच लागेल; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. यावरुन उद्धव ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळय़ास लागता कामा नयेत. तुमच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे. लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नसल्याचेही ठाकरे गटाने म्हटले आहे. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल. लक्षात ठेवा! असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याचा केवळ निषेध करून ही फाईल बंद करता येणार नाही. या कामामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशांमध्ये इतके पुतळे उभे आहेत, समुद्रात, पाण्यात पुतळे उभे आहेत. मात्र ते कोसळले नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे खरे शिवभक्त असतील तर ते दीपक केसरकर यांना मंत्रालयाच्या समोर जोडे मारतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. मालवण मधील पुतळ्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये ठाणे कनेक्शन आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव यातून पुढे येत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मिंदे सरकार भ्रष्टाचार करते आणि आता याच पैशातून तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक लढणार आहात, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मनाला झालेली सगळ्यात मोठी जखम असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, हे बरे झाले. यातून काहीतरी चांगले घडेल असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. यावर देखील संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. बरे झाले ही घाण आमच्याकडून गेली, अशा विचारांची माणसे आमच्यात नाहीत हे बरे झाले, असे म्हणत संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मिंद्यांनी पोसलेली ही औरंगजेबाची अवलाद असल्याची टीका देखील राऊत यांनी आहे. मात्र, हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचे पाप असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मिंदे आणि त्यांच्या टोळीला पोसण्याचे काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. नारायण राणे यांनी रस्त्यावर उतरायला हवे खरा शिवभक्त असेल तर खासदार नारायण राणे यांनी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरायला हवे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात देखील भ्रष्ट्राचार केला आहे. त्याचा राणे यांनी निषेध करायला हवा, ज्यांनी पैसे खाल्ले आहेत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी देखील राणे यांनी केली पाहिजे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या प्रकरणी कंत्राटदार आणि शिल्पकार हे सापडत नाहीत. ते दोघे पळून गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ते कोठे आहेत? असा प्रश्न विचारायला हवा. असे म्हणत राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… संतापजनक घटना:55 वर्षीय पित्याकडून 16 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार; आईच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत मुलींच्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूर मधील परिस्थिती सामान्य होत असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील त्याच बदलापूर मध्ये पोलिसांनी मंगळवारी एका 55 वर्षीय व्यक्तीला आपल्या 16 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुलीची आई जेव्हा कामादरम्यान रात्रीच्या शिफ्टला जात होती, तेव्हा आरोपी मुलीला टार्गेट करत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पूर्ण बातमी वाचा… ‘मातोश्री’ वर आघाडीची तातडीची बैठक:पुढील आंदोलनाची रणनीती तसेच जागा वाटपाची चर्चा होणार; ठाकरे, पवार, पटोलेंची उपस्थिती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात महिला व बाल अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. रत्नागिरी येथील घटना देखील आता ताजीच आहे. तसेच पुण्यात देखील गुंडांनी पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील पुढील दिशा ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला शरद पवार, नाना पटोले यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पूर्ण बातमी वाचा… सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ:तरी तुम्हाला जावेच लागेल; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. यावरुन उद्धव ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळय़ास लागता कामा नयेत. तुमच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे. लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नसल्याचेही ठाकरे गटाने म्हटले आहे. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल. लक्षात ठेवा! असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment