ठाणे : आपल्या लहान भावाची हत्या केल्याच्या संशयातून मोठ्या भावाने एका तरुणाची हत्या केल्याची ( Mumbra Police Arrested Accused ) धक्कादायक घटना सोमवारी मुंब्रा येथील पाणेरीपाडा येथे घडली. पाणेरीपाडा येथील डोंगराळ भागातील झाडाझुडपात सोमवारी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि पंचनामा केला. मृत तरुणाची हत्या ही धारदार शास्त्राने गळा चिरून आणि हातापायाच्या नस कापून केल्याचे निष्पन्न झाले.

मुंब्रा येथील पाणेरीपाडा येथे सोमवारी गळा चिरून हातापायाच्या नस कापलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह झुडपात टाकलेला आढळून आला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला. पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने मोठ्या शिताफीने मुंब्रा पोलिसांना २६ वर्षीय आरोपीला १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या.

Kalyan News: माहेरी गेलेल्या बायकोला परत आणायला गेला, नकार दिल्यानंतर ब्लेड काढला अन्….

मोहम्मद इत्तेहाद मोहम्मद अब्दुल वाहीद असे २० वर्षीय मृतक तरुणाचे नाव आहे. सानीफ आसु साही असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हे दोघेही मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. सानीफ याची मुंब्रा पोलिसांनी कसून चौकशी केली. आपल्या साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली त्याने दिली. आरोपी सानीफ याचा लहान भाऊ अलकरीम याची मूळ गावी पश्चिम बंगाल येथे ३ वर्षांपूर्वी हत्या झाली होती. आपल्या भावाची हत्या मृत मोहम्मद इत्तेहाद याने आपल्या ७ साथीदारांच्या मदतीने केल्याच्या संशयातून सानीफ याने आपला साथीदार झाकीर शेख याच्या मदतीने मोहम्मद इत्तेहाद याची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणात सानीफ याचा एक साथीदार फरार आहे. त्याचा शोध मुंब्रा पोलीस घेत असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.

वासुंद्री गावात भयानक जळीतकांड, महिलेसह दोन मुलींना पेट्रोल टाकून जाळण्याचाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.