भाजप नेत्यांविरोधात खोटे गुन्हे:माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा
गिरीश महाजन यांच्यासह भाजप नेत्यांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने नवीन एफआयआर दाखल केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. त्यामुळे या प्रकरणामुळे माजी मंत्री देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पेनड्राइव्हच्या दोन वर्षांच्या प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. जळगावातील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज लिमिटेड या संस्थेचा ताबा कुणाकडे असावा यावरून नीलेश भोईटे विरुद्ध ॲड. विजय पाटील हे प्रकरण निराधार असून जनतेचा कौल लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे हे षड्यंत्र सुरू केले आहे. अशा दबावाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर दिली आहे. फडणवीसांनी महाराष्ट्रात विकृत मानसिकतेचे राजकारण केले आहे. ते जनतेने पाहावे, असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आधी सीआयडीकडे आणि नंतर सीबीआयकडे सोपण्यात आला. यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, पाटील, तत्कालीन पोलिस उपायुक्त पूर्णिमा गायकवाड आणि सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी साक्षीदारांचे बनावट जवाब आणि पुरावे तयार करून भाजपचे नेते आणि इतर या प्रकरणाशी संबध नसलेल्या व्यक्तींना खोटे ठरवले. त्यामुळे सीबीआयने आता देशमुखांसह चव्हाण, पाटील, गायकवाड, आणि सुषमा चव्हाण यांच्यावर कटकारस्थाने केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण निराधार, दबावाला बळी पडणार नाही- अनिल देशमुख हे प्रकरण निराधार असून जनतेचा कौल लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे हे षड्यंत्र सुरू केले आहे. अशा दबावाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर दिली आहे. फडणवीसांनी महाराष्ट्रात विकृत मानसिकतेचे राजकारण केले आहे. ते जनतेने पाहावे, असेही ते म्हणाले.