मुंंबई: हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये केट विन्सलेटच्या (Kate Winslet Hospitalized) नावाचा समावेश होतो. दरम्यान, केट विन्सलेटबाबत मोठी बातमी समोर येत आहे. केट सध्या क्रोएशियामध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग (Kate Winslet Accident on the set of LEE) करत होती. ड्रामा पीरियड फिल्म ‘LEE’ च्या सेटवर केट जखमी झाली असून तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याठिकाणी घसरून पडल्याने केटला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचा-महेश भट्ट यांनी स्वत:च्याच मुलीला केलेलं Lip Kiss; पूजासोबत लग्न करण्याचीही होती इच्छा

‘टायटॅनिक’ फेम केटला खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याचेही अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिचं शूटिंग याच आठवड्यात ती पुन्हा सुरू करणार आहे. एका इंग्रजी मनोरंजन वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘केट घसरली असून प्रोडक्शन टीमकडून आवश्यक असलेली खबरदारी म्हणून तिला रुग्णालयात नेण्यात आले. ती ठीक आहे आणि या आठवड्यात नियोजित वेळेप्रमाणे चित्रीकरण करणार आहे.’

आगामी फीचर फिल्ममध्ये, विन्सलेट ली मिलर ही भूमिका साकारत आहे. ली ही वोग कव्हर मॉडेल असते, जी फोटोग्राफर बनते. ली यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी पत्रकार म्हणून काम पाहिले होते. केटच्या दुखापतीमुळे ‘ली’ या ऐतिहासिक ड्रामा पीरियड फिल्मचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. पण समोर आलेल्या अपडेटनुसार पुन्हा एकदा नियोजनाप्रमाणे हे शूटिंग सुरू केलं जाईल.

हे वाचा-पहिल्यांदाच घडलं असं काही! कोणत्याही संघाने जिंकला नाही ‘पुरुषोत्तम करंडक’

केट ही तीच अभिनेत्री आहे जिने १९९७ साली आलेला हॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय चित्रपट टायटॅनिकमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. या चित्रपटासाठी केट विन्सलेटला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. ४६ वर्षीय केट २००९ साली आलेल्या ‘द रीडर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.