मुंबई : अभिनेत्री अलका आठल्येंचा आज वाढदिवस. अलका कुबल म्हणून त्या प्रसिद्ध. सोशिक अभिनेत्रीची भूमिका साकारत असताना त्यांच्या पर्वाला अलका कुबल लाट असंही म्हटलं जातं. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ‘चक्र’ या पहिल्या चित्रपटात काम केले. दोन मिनिटांची भूमिका आणि समोर होत्या साक्षात स्मिता पाटील. दहावीचे वर्ष असूनही केवळ या चतुरस्र अभिनेत्रीबरोबर काम करण्याची संधी मिळावी, म्हणून त्यांनी आईला विनवणी करून तो केला.

एका मुलाखतीत अलकाताई म्हणाल्या होत्या, ‘अलका कुबल म्हटले, की ‘माहेरची साडी’ आणि त्यातील लक्ष्मी हे नाव समोर येते. ज्या कलाकृतीचे यश मी आजही उपभोगते आहे, तो हा चित्रपट. भूमिकांच्या प्रवासाला उजाळा देताना, त्या आधी आणि नंतर साकारलेल्या भूमिकाही तितक्याच जवळच्या आहेत. पहिला चित्रपट आला तो ‘लेक चालली सासरला’, पुढे ‘कमाल माझ्या बायकोची’ आणि ‘तुझ्या वाचून करमेना’ हे दोन चित्रपट केले. हे दोन्ही माझ्यासाठी खास आहेत; कारण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे या चित्रपटांत माझे नायक होते.’

नवा गडी, नवं राज्य : आनंदी रमाला काढते घराबाहेर, काय घडलं असं?

अलका आठल्ये आणि त्यांचे पती समीर आठल्ये यांची मुलगी ईशानी पायलट आहे. २०१५ मध्ये ईशानीला अमेरिकेत अधिकृत लायसन्स वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं होतं. परंतु तिला भारतात यायचं होतं. त्यामुळं तिनं पुन्हा भारतातलं लायसन्स मिळण्यासाठी आणखी परीक्षा दिल्या. त्यानंतर तिला भारतातही व्यावसायिक विमानाचे पायलट लायसन्स मिळालं.


ईशानीच्या या करिअरमध्ये अलका आणि त्यांचे पती सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांचा मोठा वाटा आहे. तिला हे मिळाल्यानंतर लेकीचं भरभरून कौतुक करताना त्या थकत नव्हत्या. जे काही केले ते तिनं केलं आम्ही फक्त पाठिंबा दिला असं त्या सांगतात. अलका कुबल यांची दुसरी लेक कस्तुरीही परदेशात शिक्षण घेतेय. ती सध्या फिलिपाइन्सला एमबीबीएस करतेय. तिला डर्मिटोलॉजिस्ट व्हायचं आहे.


२३ सप्टेंबर १९६५ ला अलकाताईंचा जन्म झाला. आज आपल्या करिअरमध्ये वेगळ्या स्थानावर विसावलेल्या अलका कुबल आठल्ये आजही काही वेगळं करू पाहतात. त्या म्हणाल्या, ‘सुमारे पाच वर्षे मी अनेक भूमिका नाकारल्या. काही वेगळे प्रयत्न केले. त्यात काही चालले नाहीत, तर काही रसिकांपर्यंत पोहोचले नाहीत. मला टर्निंग पॉइंट मिळाला, तो डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटापासून. मी वास्तवात जशी आहे, तशीच आई मी या चित्रपटात साकारली. ‘मल्टीटास्कर’ आई साकारताना मजा आली.’

आर्यनच्या अटकेवर गौरीनं सोडलं मौन, ‘त्यापेक्षा वाईट काहीच नाही’

‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटात

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.