येथील व्यंकटेश मंदिर संस्थानला अब्दुल गनी आणि नुबिना बानू या उद्योजक दाम्पत्याने एक कोटी दोन लाख रुपयांची देणगी दिली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) त्यांनी नुकताच धनादेश प्रदान केला.

 

tirupati-balaji
वृत्तसंस्था, तिरुपतीः येथील व्यंकटेश मंदिर संस्थानला अब्दुल गनी आणि नुबिना बानू या उद्योजक दाम्पत्याने एक कोटी दोन लाख रुपयांची देणगी दिली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) त्यांनी नुकताच धनादेश प्रदान केला.

गनी दाम्पत्याने विश्वस्त मंडळाचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांच्याकडे देणगी सुपूर्द केली. मंदिर परिसरातील रंगनायकुला मंडपममध्ये हा प्रदान सोहळा नुकताच झाला. देणगी दिलेल्या रकमेपैकी १५ लाख रुपये श्री व्यंकटेश्वरा अन्न प्रसादम ट्रस्टला देण्यात आले आहेत. या ट्रस्टतर्फे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना रोज प्रसाद दिला जातो. उर्वरित ८७ लाख रुपये श्री पद्मावती गेस्ट हाउसमधील स्वयंपाकघरातील फर्निचर आणि अन्य आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी देण्यात आले आहेत.

वाचाः बाळासाहेबांनी कारच्या बोनटवर उभं राहून केलं होतं भाषण; उद्धव ठाकरे इतिहासाची पुनरावृत्ती करणार?
गनी दाम्पत्याकडून यापूर्वी वस्तूरूप भेट

गनी हे चेन्नईतील उद्योजक आहेत. त्यांनी यापूर्वीही बालाजी मंदिराला विविध वस्तूंची भेट दिली आहे. करोनाच्या काळात मंदिर परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहावा यासाठी ट्रॅक्टरला जोडलेले निर्जंतुक फवारणी यंत्र २०२०मध्ये त्यांनी भेट दिले. त्या आधीही त्यांनी मंदिराला ३५ लाख रुपयांचा रेफ्रिजरेटर ट्रक भेट दिला होता. त्यातून भाजीपाल्याची वाहतूक केली जात असल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.

वाचाः Dasra Melava: दसरा मेळाव्याला तेजस ठाकरेंचं राजकीय लाँचिंग? बॅनर्स लागल्याने जोरदार चर्चा

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.