मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम गायिका फरमानी नाज श्रावण महिन्यात व्हायरल झालेल्या हिंदू भजनामुळे चर्चेत आली आहे. तिने हिंदू भजन गाण्याने काही मुस्लिम कट्टरपंथीयांनी तिच्यावर संताप आणि टीका केली आहे. आता फरमानीने यावर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक मोहम्मद रफी यांनीही सिनेमांमध्ये अनेकदा हिंदू भक्तिगीतं गायली आहेत आणि कलाकाराला कोणताही धर्म नसतो, असं नाज यावेळी म्हणाली.

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला दिग्गज अभिनेत्याच्या मुलीचा मृतदेह

फरमानीने कट्टरवाद्यांना दिलं प्रत्युत्तर

‘टाइम्स नाऊ’ वर, फरमानी तिच्यावर होत असलेल्या टीकेवर उघडपणे बोलली. ती म्हणाली की, ‘मोहम्मद रफी यांनीही भक्तिगीतं गायली आहेत. आपण मास्टर सलीम यांनाही अशी गाणी गाताना ऐकले आहे जे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी फरमानी नाजचे ‘हर हर शंभू’ हे भक्तिगीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर आक्षेप घेण्यात आला आणि इस्लाममध्ये हिंदू भक्तिगीतं गाणं हराम असल्याचं म्हटलं. फरमानीने यासाठी अल्लाची माफी मागावी, असेही देवबंदच्या उलेमांनी म्हटले. वाद वाढत असल्याचं पाहून, उलेमांनी आपलं विधान फेटाळून लावत म्हटलं की इस्लाममध्ये गाण आणि नृत्य करण्यास परवानगी नसल्याचं मत व्यक्त केलं.

‘कलाकाराला धर्म नसतो’

या विषयावर फरमानी पुढे म्हणाली की, ‘ती एक कलाकार आहे आणि सर्व प्रकारची गाणी गाऊ शकते. ती म्हणाली, ‘कलाकाराला धर्म नसतो. मी कव्वाली तसेच हिंदू धार्मिक गाणी गाऊ शकते. कोणताही कलाकार हिंदू-मुस्लिम पाहून परफॉर्म करत नाही. जेव्हा आपण गातो तेव्हा आपल्याला ते हिंदू गाणे किंवा मुस्लिम गाणे आहे असं वाटत नाही कारण गाणं गाणे हा आपला व्यवसाय आहे.’ यासोबतच आपल्या विरोधात कोणताही फतवा काढला नसल्याचेही तिने स्पष्ट केले.

कोण आहे अभिनेत्री श्रीलेखा मित्रा, जिने सेक्स टॉइजवरून अर्पिताला घेरलं

मुफ्ती म्हणाले- इस्लाममध्ये भजन गाणे हराम आहे

याआधी मुफ्ती असद कासमी यांनी फरमानी नाजबद्दल म्हटले होते की, तिने केलेल्या कृत्यासाठी इस्लाममध्ये माफी नाही. मुफ्ती म्हणाले, ‘मला सांगायचे आहे की इस्लाममध्ये नृत्य आणि गाण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात नाही. इस्लामिक संस्कृतीत त्याला हराम म्हणतात. ज्या मुलीने हे गाणे गायले आहे तिने यासाठी अल्लाची माफी मागावी.’ मुफ्ती म्हणाले की, ‘फरमानीला इस्लाममधून बेदखल करण्यात आलेले नाही, परंतु त्यांनी असे कृत्य केले आहे जे हराम आणि निषेधार्ह आहे, ते पुन्हा करू नये.’

‘अल्लाने आवाज दिला आहे, भजन गाण्याने कोणी हिंदू होत नाही’

मुफ्तींच्या या वक्तव्यानंतर फरमानी नाज म्हणाी की, मला अशा लोकांबद्दल बोलण्याची गरज नाही. ती पुढे म्हणालाी, ‘हे अजिबात हराम नाही. अल्लाने दिलेला आवाज सर्वजण वापरत आहेत. भजने गाऊन कोणी हिंदू होत नाही. आम्ही फक्त कलाकार आहोत.’

जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधवSource link

Leave a Reply

Your email address will not be published.