नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची रक्कम केंद्र सरकार देते. केंद्र सरकारनं ही योजना डिसेंबर २०१८ मध्ये घोषित केली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेद्वारे १४ हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. १४ व्या हप्त्याची रक्कम जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. आता शेतकऱ्यांना पीएम किसानच्या १५ व्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार १५ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात १५ नोव्हेंबर २०२३ रोजी वर्ग केली जाणार आहे. मात्र, अद्याप यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर आलेली नाही. योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना १४ हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. म्हणजेच एका लाभार्थी शेतकऱ्याला २८ हजार रुपये योजना सुरु झाल्यापासून मिळाले आहेत. जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेच्या १५ व्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला तुमचं नावं लाभर्थी यादीत आहे का हे पाहण आवश्यक आहे. लाभार्थी शेतकरी पीएम किसानच्या वेबसाईटला भेट देऊन यासंदर्भातील माहिती नाव शोधू शकतात.
लाभार्थी यादीत नाव कसं शोधायचं?
-जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ वेबसाइटला भेट द्यावी.-पेमेंट सक्सेस टॅबच्या खाली भारताचा नकासा दिसेल.- त्याच्या उजव्या बाजूला डॅशबोर्ड असेल त्यावर क्लिक करा.-डॅशबोर्डच्या टॅबवर तुम्हाला तुमची आवश्यक ती माहिती भरावी लागेल. – राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडा-यानंतर तुम्ही तुमची माहिती तपासून पाहू शकता..पीएम किसान सन्मान योजनेचे शेतकरी काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी pmkisan-ict@gov.in या ठिकाणी इमेल करु शकतात. पीएम फार्मर स्कीमच्या हेल्पलाइन क्रमांकावर देखील ते संपर्क करु शकतात.
योजनेची स्थिती कशी पाहाल?
– प्रथम पीएम किसानच्या वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या. -तुमची स्थिती जाणून घ्या वर क्लिक करा.- नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवा आणि Get Data वर क्लिक करा -तुम्हाला तुमची स्थिती दिसेल. Read Latest And