मुंबई: महानायक अमिताभ बच्चन यांचे (Amitabh Bachchan) कुटुंब अनेकांसाठी आदर्श कुटुंब आहे. अमिताभ बच्चन यांचे त्यांच्या कुटुंबावर असणारे प्रेम त्यांच्या विविध सोशल मीडिया पोस्टमधून अनेकदा दिसते. सोशल मीडियावर ते मुलगी श्वेता नंदा (Shweta Bachchan Nanda) आणि अमिषेक बच्चन (Abhishek Bachcha) यांच्याविषयी अनेकदा लिहिताना दिसतात. बच्चन फॅमिलीचे अनेक ‘परफेक्ट फॅमिली’ फोटोज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान आज अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिने वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली आहे आणि निमित्त आहे फादर्स डे चं! (Father’s Day 2022)

हे वाचा-६ महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने दिली डान्स ऑडिशन, DID Supermoms वर भडकले नेटकरी

श्वेता नंदा हिने अमिताभ यांच्यासह एक सेल्फी पोस्ट केला आहे. मात्र कॅप्शन लिहिताना तिच्याकडून एक चूक झाली आहे. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या असून श्वेताचा भाऊ अर्थात अभिनेता अभिषेक बच्चन याने देखील कमेंट केली आहे. अभिषेकने यावेळी बहिणीला ट्रोल करण्याची संधी अजिबात सोडली नाही.

हे वाचा-काजलला अभिनेत्याने न सांगताच केलं होतं किस? त्या घटनेची झालेली जोरदार चर्चा

श्वेताने काय केली चूक?
श्वेता नंदा अमिताभ यांच्यासह शेअर केलेल्या या फोटोला असं कॅप्शन देऊ इच्छित होती की, ‘रिश्ते में तो सिर्फ़ मेरे … लगते हैं’. तिने दिलेली कॅप्शन पटकन वाचली तर तुम्हाला यातील चूक लक्षात येणार नाही. पण ही चूक अभिषेकच्या नजरेतून सुटली नाही. श्वेताने अमिताभ यांचाच हा डायलॉग लिहिताना ‘में’ या शब्दाऐवजी ‘मैं’ असा शब्द वापरला आहे. त्यामुळे वाक्याच्या अर्थही बदलून जातो. ही चूक अभिषेकच्या लक्षात येताच त्याने ‘स्पेलिंग’ अशी कमेंट करत डोक्याला हात मारुन घेणारी इमोजी पोस्ट केली आहे. अभिषेकने या छोट्याशा चुकीसाठी देखील श्वेताला त्रास देण्याची संधी सोडली नाही आहे.


श्वेताने पोस्ट केलेल्या या फोटोसाठी ‘लिमिटेड कमेंट’चा पर्याय निवडला असला तरी अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी यावर कमेंट केली आहे. अनेकांना अमिताभ यांचा हा अंदाज आवडला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.