मुलांचे संगोपन करताना कायमच आई सर्वात आधी येते. आईशिवाय मुलांचे संगोपन होऊ शकत नाही, असे प्रत्येकाला वाटते. मुलं वडिलांशिवाय मोठी होतात, आईशिवाय होत नाहीत, हा डायलॉग भारतात खूप प्रसिद्ध आहे. मुलांचे संगोपन आणि त्यांना सांभाळणे, हे आईचे काम आहे असे सामान्यतः मानले जाते. लहानपणापासून मुलं आणि आपल्या प्रत्येकावरच हे संस्कार झालेले असतात. मुलांच संगोपन होत असताना आईची पहिली प्राथमिकता आणि वडील दुसऱ्या क्रमांकावर येतात. भारतातही असे मानले जाते की फक्त आईच मुलांना वाढवू शकते.

मात्र, आता हा विचार आणि लोकांची ही धारणा बदलत असून वडीलही मुलांचे चांगले संगोपन करू शकतात, हे समोर येत आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटी फादर्सबद्दल सांगत आहोत जे एकट्याने मुलांचे संगोपन करतात. सिंगल पॅरेंटिंग हे सोपे काम नाही आणि जर तुम्ही सेलिब्रिटी पालक असाल तर तुमचे काम आणखी कठीण होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या सेलिब्रिटी वडिलांबद्दल जे आपल्या मुलांचे संगोपन एकटेच करत आहेत. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​रिकी मार्टिन

ग्रॅमी विजेता रिकी मार्टिन हे दोन जुळ्या मुलांचे वडील आहेत. 2008 मध्ये सरोगसीच्या मदतीने रिकी वडील झाला. सिंगरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्या लैंगिकतेमुळे तो कधीच पालक बनू शकणार नाही या भीतीने तो अनेक वर्षांपासून जगत होता.

(वाचा – ब्रेस्टफिडींगमुळे वाढते बाळाची ब्रेन पॉवर? जाणून घ्या काय आहे स्तनपानाचे फायदे)

​करण जोहर

करण जोहरने फिल्म इंडस्ट्रीत उत्तम काम केले आहे आणि वैयक्तिक आयुष्यातही तो चांगला पिता आहे. 2017 मध्ये सरोगसीच्या मदतीने करण दोन जुळ्या मुलांचा बाप झाला. करणने अनेकदा सांगितले आहे की, वडील झाल्यानंतर त्याचे आयुष्य खूप बदलले आहे.

(वाचा – Fathers Day 2022 : फादर्स डे ला हे १० मॅसेज पाठवून वडिलांना द्या खास शुभेच्छा

​टॉम क्रूझ

टॉम क्रूझ तीन मुलांचा बाप आहे. टॉमला एक मुलगी असून त्याने दोन मुले दत्तक घेतली आहेत. टॉम म्हणतो की त्याला आयुष्यभर वडील व्हायचे होते आणि वाटले की त्याची मुले कोणत्याही गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकतात. टॉम म्हणतो की मला वाटत नाही की जास्त प्रेम मुलांचे बिघडवते.

(वाचा – ‘या’ आजारामुळे पुरुषांना पिता बनता येत नाही, यामुळे कुटुंब नियोजन राहते अपूर्ण))

​तुषार कपूर

तुषार कपूर 2016 मध्ये सरोगसीच्या मदतीने सिंगल फादर झाला होता. तुषार सोशल मीडियावर आपल्या मुलांसोबत व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असतो. तुषारने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला नेहमीच वडील व्हायचे होते.

(वाचा – Kajal Aggarwal : सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालने मुलाचं नाव ठेवलं इतकं युनिक व सुंदर, ऐकणारा प्रत्येक माणूस करतोय तोंडभरून कौतुक..!

​ब्रॅड पिट

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता ब्रॅड पिट हा 6 मुलांचा बाप आहे. पिट आणि त्याची माजी पत्नी एंजेलिनो जोली यांनी 2005 मध्ये डेटिंग करण्यास सुरुवात केली आणि तीन वर्षांनंतर, पिटने अँजेलिनाचा दत्तक मुलगा मॅडॉक्सला दत्तक घेतले.

(वाचा – पुरूषांमधील स्पर्मची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, ‘अझोस्पर्मिया’ सारख्या आजारापासून व्हाल मुक्त))Source link

Leave a Reply

Your email address will not be published.