वडिलांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. पूर्वी हा दिवस फक्त परदेशात साजरा केला जायचा. पण आता सगळ्याच ठिकाणी हा साजरा केला जातो.
जगभरातील देशांमध्ये फादर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये 8 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. त्याच वेळी, थायलंडमध्ये, 5 डिसेंबर रोजी फादर्स डे साजरा केला जातो.
6.

१९ जून रोजी साजरा केला जातो ‘फादर्स डे’

बाबा तुम्ही चांगले वडिल
असण्यासोबतच
माझे चांगले मित्र आहात…
फादर्स डे च्या शुभेच्छा बाबा
माझे वडील माझ्याबरोबर नसेल तरीही
मला खात्री आहे की, त्यांचा आशिर्वाद
कायमच माझ्याबरोबर आहे.
(वाचा – ‘या’ आजारामुळे पुरुषांना पिता बनता येत नाही, यामुळे कुटुंब नियोजन राहते अपूर्ण))
बाबा आणि लेकीचं नातं खास

३. बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांना
हॅप्पी फादर्स डे बाबा
४. जर आई धरणी आहे तर वडील गगन
आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी
वडिलांना फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा
(वाचा – Kajal Aggarwal : सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालने मुलाचं नाव ठेवलं इतकं युनिक व सुंदर, ऐकणारा प्रत्येक माणूस करतोय तोंडभरून कौतुक..!))
मुलं आणि बापाचं नातं खास

५.खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
६. स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
फादर्स डे साजरा करताना हे मॅसेज पाठवा

७. बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
८. बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
(वाचा – SSC Results 2022 : मुलाला कमी मार्क्स मिळाले, तर ओरडण्यापेक्षा पालकांनी असं करा रिऍक्ट, ५ टिप्स)
बाबा आणि मुलाचं नातं असतं खास

९. आयुष्यात सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे
१०. तुम्हीही कितीही
मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस आहे
ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा…
(वाचा – ‘या’ फायद्यांसाठी काही पालक करतात बेबी प्लान, तुम्ही देखील असाच विचार करताय? जाणून घ्या)