मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी कठोर परिश्रम आणि समर्पणाने व्यवसायाला शिखरावर नेऊन ठेले होते. रिलायन्स समूहाचे साम्राज्य वाढवण्याबरोबरच धीरूभाईंनी कौटुंबिक संबंधांचीही काळजी घेतली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) संस्थापक धीरूभाई अंबानी नातेसंबंधांना खूप महत्त्व देणारे होते. व्यवसाय क्षेत्रापासून राजकारणाच्या पायऱ्यांपर्यंत त्यांनी नात्यांची लगाम कधीच ढळू दिली नाही. दिवंगत दिग्गज उद्योगपती धीरूभाई खूप दूरदर्शी आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारे होते. मात्र, त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्याकडून मोठी ‘चूक’ झाली, ज्याने दोन भावांच्या नात्याला तडे गेले.

Success Story: ५०० रुपये घेऊन मुंबईला आले, व्यापार विश्वाचे बनले बेताज बादशाह! ही आयडिया ठरली टर्निंग पॉईंट
दोन भाव एकमेकांचे सख्खे वैरी
हयात असताना धीरूभाई आपल्या मुलांच्या नावे मृत्युपत्र केले नाही, त्यामुळे संपत्तीवरून मुकेश आणि अनिल यांच्यातील संबंध ताणले गेले ही दुसरी बाब आहे. दूरदर्शी विचारसरणीचे धीरूभाई अंबानींनी कदाचितच असे काही घडेल याचा विचार केला असेल. मुकेश आणि अनिल ज्याप्रकारे एकमेकांवर जीव ओवाळून टाकायचे, त्याचप्रमाणे आपल्या व्यावसायिक साम्राज्यालाही असे नशीब येणार नाही, असे त्यांना वाटत राहिले. मात्र, २००२ मध्ये धीरूभाई अंबानींनी जगाचा निरोप घेताच भावांमध्ये वर्चस्वाचे युद्ध सुरू केले. अखेरीस २००५ मध्ये आई कोकिलाबेन अंबानी यांच्या मध्यस्थीनंतर रिलायन्स समूहाचे विभाजन झाल्यानंतरच सर्व गोष्टी शांत झाल्या. पण, तोपर्यंत भावांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

अंबानी कुटुंबाशी स्पर्धा, टाटांशीही वाद; मोठ्या उद्योगपतींविरुद्द युद्ध छेडणारे नुस्ली वाडिया आहेत तरी कोण?
धीरूभाई अंबानींची एक चूक रिलायन्सला महागात पडली
मृत्यूपत्र न करण्याच्या धीरूभाई अंबानींच्या चुकीमुळे मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातील संबंध ताणले गेले. दोघा भावांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. २००२ मध्ये वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांचे संबंध बिघडू लागले.

मृत्यूपत्र बनवणे एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग मानला जातो कारण यामुळे नंतर मतभेदाची शक्यता संपते. कायदेशीर पेच आणि कौटुंबिक कलहांना वाव नाही पण, धीरूभाईंना या अत्यंत महत्त्वाच्या पैलूचा अंदाज लावण्यात अपयश आले. आपल्या मुलांच्या एकमेकांवरील परस्पर प्रेमावर त्यांचा इतका विश्वास होता की कदाचित त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे. पण, जे घडले ते अनेकदा पाहायला मिळाले आहे. वडिलांच्या निधनानंतर भावांमध्ये दुरावा निर्माण झाला, ज्याच्या केंद्रस्थानी धीरूभाई अंबानी यांनी हयात असताना कमावलेली अफाट संपत्ती होती.

भारतीय अब्जाधीश गॅरेजमध्ये राहिले, चपाती अन् पाण्यावर दिवस काढले, पाहा परिस्थिती कशी बदलली
रिलायन्सच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई
२००२ मध्ये वडिलांच्या निधनानंतर रिलायन्स ताब्यात घेण्यासाठी दोन्ही भावांमध्ये संघर्ष सुरू झाले. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रिलायन्स ताब्यात घेण्यासाठी दोन्ही भावांमध्ये युद्ध सुरू झाले. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले. तर अनिल अंबानी व्हाईस चेअरमन तर अनिल अंबानी उपाध्यक्षपदी विराजमान झाले. संघर्ष इतका वाढला की दोन्ही भावांनी कोर्टाची पायरी चढली.

कल्चरल क्लबचं स्वप्न पूर्ण, पत्नी नीताचे आभाराचे शब्द ऐकून मुकेश अंबानींचे डोळे पाणावले

२००५ मध्ये दोन्ही भावांमध्ये संपत्तीचे बरोबर वाटप झाले. मुकेश अंबानींच्या वाट्याला तेल आणि वायू, रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्ससह कापड व्यवसाय आले तर त्याच वेळी अनिल अंबानींना आर्थिक सेवा, वीज, मनोरंजन आणि दूरसंचार व्यवसाय मिळाले. या विभाजनानंतर मुकेश अंबानींनी आपला व्यवसाय वेगाने पुढे नेला. मुकेश अधिक श्रीमंत होत गेले तर अनिल अंबानी आपली संपत्ती गमावत राहिले. २०२० मध्ये अनिल अंबानींनी त्यांची एकूण संपत्ती शून्य असल्याचे जाहीर केले. सध्या दोन्ही भावांच्या संपत्तीत जमीन-आसमानाचा फरक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *