मुंबई: ‘निकाल निश्चिती होत नाही; पण स्पॉट फिक्सिंग आणि वैयक्तिक फिक्सिंग नक्कीच होते,’ असा दावा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी केला. गायकवाड आणि माजी कसोटीपटू उमेश कुलकर्णी यांना मुंबईतील खास कार्यक्रमात शनिवारी गौरवण्यात आले.
‘गट्स आणि ग्लोरी क्रिकेट सन्मान’ संध्येत गायकवाड आणि कुलकर्णी यांना दिलीप वेंगसरकर आणि करसन घावरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात मैदानावरील आणि मैदानाबाहेरील अनेक किस्से माजी क्रिकेटपटूंनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांनी १९९७ मध्ये श्रीलंकेत झालेल्या स्पर्धेबाबत विचारले. त्या सामन्याचा निकाल निश्चित असल्याची चर्चा होती. त्या वेळी संघाचे प्रशिक्षक असलेल्या गायकवाड यांनी याबाबत भाष्य केले. ‘श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम लढतीपूर्वी मला एक निनावी फोन आला. त्या वेळी मला अंतिम सामन्याचा निकाल फिक्स असून, भारत हरणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर मी संघातल्या मुख्य खेळाडूंसह चर्चा केली. त्या वेळी सचिन तेंडुलकर आणि महंमद अझरुद्दीनने असे काहीही झालेले नाही. आपणच विजेते होणार, अशी ग्वाही दिली.

IND vs AUS-सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला पराभवाचं टेन्शन! भारतीय संघामध्ये दाखल भारतीय संघामध्ये दाखल

सामन्यापूर्वी ठरलेल्या योजनेनुसारच आपले खेळाडू खेळले आणि आपण स्पर्धा जिंकलो. त्यामुळे माझा निकाल निश्चितवर विश्वास नाही. निकाल निश्चित करण्यासाठी दोन्ही संघातले किमान चार-पाच खेळाडूंचा त्यात सहभाग हवा. असे होत असावे मला वाटत नाही. अर्थात निकाल निश्चिती सिद्धही झाली आहे. निकाल निश्चितीपेक्षा स्पॉट फिक्सिंग किंवा वैयक्तिक फिक्सिंग शक्य आहे,’ असे गायकवाड यांनी सांगितले.

कसोटीपटूचा टॅग दिलेला खेळाडू आता ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवणार, शमीच्या जागी मिळाला भारताला घातक गोलंदाज

अलिबागला दगडाने नारळ पाडण्यात मी पारंगत होतो. ही दगड मारण्याची कलाच माझी गोलंदाजीची स्टाइल झाली. गिरगावला मामाकडे आल्यावर शालेय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. माझ्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात अनवाणीच झाली. हॅरिस स्पर्धेत मित्रांचे कपडे आणि शूज घेऊन खेळलो होतो. तेथूनच भारतीय संघापर्यंत पोहोचलो, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

बजरंग पुनियाने रचला इतिहास,जागतिक कुस्ती स्पर्धेत इतकी पदक मिळवणारा पहिला

निवड समितीचा अध्यक्ष असताना कपिलला खेळणे थांबव हे सांगणे कठीण होते. सर्वाधिक विकेटचा विश्वविक्रम केल्यानंतर कपिलने आणखी दोन वर्षे खेळणार असल्याचे सांगितले. कपिलने आता थांबायला हवे, असे सर्वांना वाटत होते. हे सांगण्याची जबाबदारी सर्वांनी माझ्यावर टाकली. कपिलनेही एका महान खेळाडूप्रमाणे माझे ऐकले आणि सन्मानाने निवृत्ती जाहीर केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.