अहमदाबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली आणि त्याआधी विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर मैदानावर एकत्र दिसले. फायनलपूर्वी विराट कोहलीला सचिन तेंडुलकरकडून आशीर्वादासह खास गिफ्ट मिळालं आहे.

विराटला मिळालं खास गिफ्ट

सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर विराट कोहलीसोबत मैदानावर दिसला होता. दोन्ही दिग्गज एकमेकांना मिठी मारताना दिसले आणि यादरम्यान सचिनने आपली स्वाक्षरी केलेली खास जर्सी विराटला दिली. तसेच अंतिम सामन्यापूर्वी फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला क्रिकेटच्या देवाचे आशीर्वाद मिळाले. उल्लेखनीय म्हणजे २०११ च्या विश्वचषक फायनलमध्ये विराट आणि सचिन टीम इंडियाचा एकत्र भाग होते. या विश्वचषक सामन्यात सचिन तेंडुलकर जी जर्सी घालून खेळला होता. आता त्याने तीच जर्सी विराटला खास भेट म्हणून दिली आहे.
सचिनचा विक्रम मोडला

उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावून विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० शतके करणारा विराट आता एकमेव खेळाडू आहे. सचिन हा मास्टर ब्लास्टर होता तर विराट हा मॉडर्न मास्टर आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांच्या बाबतीतही विराट सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.


कौतुक

याआधी सचिन तेंडुलकरनेही विराटला त्याच्या ४९व्या आणि ५०व्या शतकाबद्दल खास शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने X वर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या. सचिनने ५०व्या शतकानंतर ड्रेसिंग रूममध्ये विराटसोबतची पहिली भेट झाल्याची घटना सांगितली होती. विराटने सचिनसोबतच्या पहिल्या भेटीत त्याच्या पाया पडला होता.

विराट कोहलीची शतकी खेळी, ५० वं दमदार शतक ठोकलं





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *