रांची: झारखंडमधील एका शेतकऱ्याने शेतीच्या कामांसाठी तसेच, उत्तपन्नाचं स्त्रोत वाढावं यासाठी महिंद्रा फायनान्स नावाच्या कंपनीकडून ट्रॅक्टर फायनान्स करवून घेतला. त्याला असं वाटलं की याने कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल, पण फायनान्स कंपनीकडून ट्रॅक्टर घेणे त्यांना अत्यंत महागात पडले आहे. कंपनीच्या एजंटने याच ट्रॅक्टरने दिव्यांग शेतकरी मिथिलेश मेहता यांच्या गरोदर मुलीला चिरडून ठार केले आहे. मृत महिला तीन महिन्यांची गर्भवती होती.

हजारीबाग जिल्ह्यातील इचक येथील मिथिलेश मेहता या शेतकऱ्याला एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी करणे इतके महागात पडले की, त्यांना आपल्या मुलीचा जीव देऊन त्याची किंमत चुकवावी लागली आहे. मिथिलेश मेहता यांची २७ वर्षीय गर्भवती मुलगी मोनिकाला फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने ट्रॅक्टरने चिरडून ठार केले. वास्तविक हजारीबाग जिल्ह्यातील इचक येथील शेतकरी मिथिलेश ठाकूर यांनी महिंद्रा फायनान्स नावाच्या कंपनीकडून ट्रॅक्टर खरेदी केला होता, त्याच ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यास उशीर झाल्यामुळे फायनान्स कंपनीचे एजंट ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी आले होते.

हेही वाचा –तीन कोटी रोख, ५० किलो सोनं, १३ काडतुसं, पाहा महंत नरेंद्र गिरींच्या खोलीत काय-काय सापडलं

थकबाकीवरुन वाद आणि गर्भवती मोनिकाचा मृत्यू

थकबाकीवरुन वाद झाल्यानंतर फायनान्स कंपनीच्या एजंटने ट्रॅक्टर जबरदस्तीने नेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेतकरी मिथिलेशची मुलगी मोनिकाने कंपनीच्या एजंटला ट्रॅक्टर नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्या एजंटने त्याच ट्रॅक्टरने मोनिकाला तुडवले. यादरम्यान ती जखमी झाली आणि रुग्णालयात नेत असताना गर्भवती मोनिकाचा मृत्यू झाला.

१ लाख २० हजारांसाठी गर्भवती महिलेचा मृत्यू

हजारीबाग येथील शेतकरी मिथिलेश मेहता यांनी महिंद्रा फायनान्सकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केले होते. दोन दिवसांपूर्वी कंपनीकडून १,२०,००० रुपयांचा थकबाकीचा हप्ता जमा करा, असा मेसेज आला. परंतु मिथिलेश ही रक्कम देय तारखेला जमा करु शकले नाही. दरम्यान, गुरुवारी त्यांचा ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर उभा होता, त्याचवेळी एका कारमधून चार जण आले आणि त्यातील एकाने ट्रॅक्टर सुरु केला आणि घेऊन जाऊ लागला. त्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने मिथलेश मेहता यांना याबाबत माहिती दिली. शेतकरी मिथिलेश आणि त्यांची मुलगी मोनिका यांनी ट्रॅक्टरच्या मागे धावत ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या एजंटला थांबवले.

हेही वाचा –नंदुरबारमधील विवाहितेचा दुसरा शवविच्छेदन अहवाल समोर, डॉक्टरांकडून संशय व्यक्त

ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोनिकाला चिरडलं

मिथलेश आणि मोनिका यांनी ट्रॅक्टर थांबवल्यावर मागून येणारी कारही थांबली. इतक्यात एक व्यक्ती गाडीतून बाहेर आली आणि म्हणाली की, १ लाख २० हजार रुपये घेऊन ऑफिसला या. तेव्हा मिथिलेश म्हणाले की, मी पैसे आणले आहेत, पण तुम्ही लोक तुमची ओळख सांगा. यावर शेतकरी मिथिलेशने ओळखपत्र मागितले असता आरोपीने स्वत:ला महिंद्रा फायनान्सचे झोनल मॅनेजर असल्याचे सांगितले. हे ऐकून आरोपीला राग आला आणि त्याने ट्रॅक्टर चालवण्याचा इशारा केला. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी मोनिकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चालकाने तिला त्याच ट्रॅक्टरने चिरडले.

हेही वाचा –खोल समुद्रात जहाज बुडू लागलं, भारतीय तटरक्षक दलाने १९ जणांना मोठ्या जिकरीने वाचवलं….

ट्रॅक्टरने चिरडल्याने जखमी झालेल्या मोनिकाचा रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा येथे तिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचवेळी हजारीबागचे एसपी मनोज रतन चोथे म्हणाले, ‘ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची चौकशी केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. पोलिसांच्या माहितीशिवाय एजंट वसुली कशी करतात, याचाही तपास केला जाणार आहे. लवकरच सर्व आरोपी तुरुंगात येतील’.

कांदा निर्यात धोरणाविरोधात धनंजय मुंडेंचं शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्रSource link

Leave a Reply

Your email address will not be published.