डीएनए तपासाचा अहवाल आल्यानंतर या गुंतागुंतीच्या प्रकरणाशी संबंधित माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. याप्रकरणी पुढे काय कारवाई करायची हे न्यायालय ठरवेल. एसडीओपी रवींद्र मिश्रा यांनी सांगितले की, कांचनसह शन्नू उईके आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. डीएनए चाचणीचा अहवाल बुधवारी आला. कांचन ही शन्नूची मुलगी असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
९ वर्षांपूर्वी १४ वर्षांची कांचन घरातून अचानक गायब झाली होती. पोलीस तपासात २०२१ मध्ये कांचनचा खून झाल्याचे उघड झाले. १३ जून २०१४ च्या रात्री भाऊ सोनू याने कांचनवर काठीने हल्ला करून तिची हत्या केली, असा आरोप होता. या प्रकरणी सोनू आणि त्याचे वडील शन्नू यांना सिंगोडी पोलिसांनी आरोपी ठरवले होते. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी एक सांगाडाही जप्त केला आहे. २९ मार्च २०२३ रोजी कांचन अचानक गावात परतली. तिने तीच कांचन असल्याचा दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस पुन्हा तपास करत आहेत.
आता या प्रकरणी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की २०२१ मध्ये पोलिसांना जो सांगाडा आढळून आला होता तो कोणाचा होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वांसमोर मोठा प्रश्न हा आहे की 2021 मध्ये पोलिसांनी कबर खोदून कोणाचा सांगाडा जप्त केला होता. कांचन समोर आल्यानंतर तिच्या वडिलांनी सांगितलं की ज्या ठिकाणाहून सांगाडा जप्त करण्यात आला ते ठिकाण त्यांचे वडिलोपार्जित स्मशानभूमी आहे. पोलिसांनी जप्त केलेला सांगाडा त्यांच्या मावशीचा आहे. जो त्यांनी कांचनचा असल्याचं सांगितलं होतं.