हलक्या वाहनांमध्ये फ्रंट- बॅक सीट बेल्ट अलार्म सिस्टिम अनिवार्य असेल:वाहतूक धोरण, 2025 पासून हलक्या, 2026 पासून जड वाहनांना लागू

रस्ते अपघात कमी करण्यासाठी येत्या दोन वर्षांत वाहतूक धोरणात दोन महत्त्वाचे बदल लागू केले जातील. २०२५ पासून, हलक्या खासगी व सार्वजनिक वाहनांसाठी नवीन मानके निश्चित केली जातील. अवजड वाहनांसाठी २०२६ पासून नवीन नियम लागू होतील. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अंदाजानुसार यामुळे गंभीर जखमी व मृतांची संख्या कमी होईल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ३१ मार्च २०२५ नंतर उत्पादित हलक्या वाहनांमध्ये पुढील आणि मागील सीटसाठी बेल्ट अलार्म सिस्टिम अनिवार्य असेल. स्पीड ब्रेकरसारखे दोष दूर करू : नितीन गडकरी रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते अभियांत्रिकीमधील उणिवा येत्या दोन वर्षांत दूर करू. बहुतांश अपघातांत डीपीआरमधील त्रुटी रस्ता तयार करण्यापूर्वी लक्षात आल्या होत्या. यामध्ये तीव्र वळणे, वेग कमी करण्यासाठी ब्रेकर, निकृष्ट बांधकाम साहित्य, मार्जिन लेनसारख्या डझनभर उणिवा शोधल्या जात आहेत. महामार्गांच्या डीपीआरला मंजुरी देण्यापूर्वी त्याची संगणकीय प्रतिमा पाहिली जाईल. – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री बसमध्येही सीट बेल्ट अनिवार्य… २०२६ पासून सीट बेल्ट अलार्म सिस्टिम जड वाहनांनाही लागू होईल. यात बस, ट्रॅव्हलर आणि मिनी बसेस सहभागी. प्रत्येक सीटवर सीटबेल्ट लावणे अनिवार्य. सरकारी बसेसमध्ये प्रवासापूर्वी सुरक्षा मानकांबाबत उद‌्घोषणा करावी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment