मुंबई : राज्य सरकारकडून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर झालेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. शिक्षणासाठी अन्य देशांत गेलेल्या ३४ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी १२ कोटी ८८ लाख रुपयांच्या निधीला इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने नुकतीच मंजुरी दिली. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने विभागाकडून नियोजन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारने ३४ विद्यार्थ्यांच्या विदेशी शिक्षणासाठी ही रक्कम मंजूर केली आहे. यामध्ये यावर्षीच्या ३२, तर गेल्या वर्षीच्या दोन विद्यार्थांचा समावेश आहे. सरकारने निधीला मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना पैसे मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

राज्य सरकारकडून परदेशी शिक्षणासाठी ५० ओबीसी विद्यार्थ्यांना यावर्षी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीच्या भरोशावर काही विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशातील कॉलेजांमध्ये दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांना महिनाभरात सरकारकडून पैसे मिळतील, अशी आशा होती. त्या हिशेबाने पैसे घेऊन ते विदेशात गेले होते. मात्र सरकारकडून त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली नसल्याने त्यांना परदेशात राहणे व दररोजचा खर्च भागवणेही अवघड झाले आहे. याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिले होते. त्याची दखल घेत सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती निधीला मंजुरी दिली.

Mumbai News: मराठा समाजातील २१ जणांना शिष्यवृत्ती; परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती निधीला मंजुरी मिळाली आहे. आता विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

– सिद्धार्थ झालटे, उपसचिव, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *