[ad_1]

मुंबई- सनी देओलचा गदर २ सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. विशेष म्हणजे गदर २ मुळे पुन्हा एकदा चित्रपटगृहांची शान परत आली आहे. गदर २ च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तारा सिंग आणि सकिना यांच्या कमबॅकवर आता प्रेक्षक प्रतिक्रिया देत आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर हा चित्रपट चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे.

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आगाऊ बुकिंगमध्ये चित्रपटाची जवळपास २० लाख तिकिटे विकली गेली आहेत. अशा परिस्थितीत गदर २ चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे या चित्रपटाबद्दल काय म्हणणे आहे ते जाणून घेऊ. सिनेव्यापार तज्ज्ञ तरण आदर्श यांनी गदर २ वर त्यांची प्रतिक्रिया दिली. त्यांनी या चित्रपटाचं वर्णन कंटाळवाणा आणि कालबाह्य असं केले असून चित्रपटाला केवळ दीड स्टार दिले आहेत.

दरम्यान, सनी देओल आणि गदरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. २२ वर्षांनंतर आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलचे अनेकांनी कौतुक केले, तर काहींनी याला चित्रपट कमी आणि सर्कस जास्त म्हटले आहे. म्हणजेच अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत हा चित्रपट हिट ठरला असला तरी आगामी काळात त्याचे आकडे बदलण्याची शक्यता आहेत.

काय आहे जनतेची प्रतिक्रिया

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ ला तरण आदर्शने दीड स्टार दिले आहेत. सिनेव्यापार विश्लेषकाने चित्रपटाला असह्य म्हटले आहे. तर चित्रपट पाहून आलेल्या एका युजरने लिहिले- ‘आत्ताच गदर २ पाहिला. एक चित्रपट जो चित्रपटासारखा कमी पण सर्कस अधिक वाटतो. सिनेमात गीतांशिवाय गायनाशिवाय काहीही चांगले नाही. कथा, संवाद, पटकथा सर्व निकृष्ट दर्जाचे भोजपुरीप्रमाणे गदर २ आहे. तर काही प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडला असून सिनेमाच्या पूर्वाधाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

गदर २ ची आहे OMG 2 शी स्पर्धा

‘गदर २’ ने बुधवारपर्यंत आगाऊ बुकिंगमध्ये देशभरात ३ लाख ९१ हजार ९७५ तिकिटे विकली. विशेष म्हणजे यापैकी १ लाख १० हजार तिकिटांचे आगाऊ बुकिंग बुधवार, ९ ऑगस्ट रोजीच झाले. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘गदर २’ पहिल्या दिवशी ३५ कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकतो. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर, आज म्हणजे ११ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या OMG 2 शी टक्कर होत आहे. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘वेड’च्या टेलिव्हिजन प्रिमिअरपूर्वी अनोखा विक्रम, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *