[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गौरी-गणपती उत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. मात्र, गणेशोत्सवाला केवळ पाच दिवस शिल्लक असूनही अद्यापपर्यंत वितरणाला सुरुवातच झाली नाही. कुठे रवा तर कुठे चणाडाळ, असे अर्धवट साहित्य प्राप्त झाल्याचे रेशन विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक यांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय २२ ऑगस्ट २०२३ रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला. यापूर्वीही गेल्यावर्षी २०२२च्या दिवाळी सणानिमित्त तसेच २०२३मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा शिधा वितरित करण्यात आला होता. गेल्यावेळी शिधा मिळायला विलंब झाल्याने नाराजीही व्यक्त करण्यात आली होती.

सणाला शिधा नाही अन् नंतर भेटून काय करायचं? पाडव्याला आम्ही आमची भाजी भाकरी खातो

यंदा तरी हा शिधा वेळेत मिळावा, अशी अपेक्षा होती. गौरी-गणपतीसाठी आतापर्यंत शिधा वितरित व्हायला सुरुवात होणे अपेक्षित होते. जिल्हा पुरवठा शाखेनेही ६ सप्टेंबरपासून वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, याची अद्यापतरी अंमलबजावणी होताना दिसत नाही. रवा, चणाडाळ, साखर हे प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर खाद्यतेल अवघ्या १०० रुपयांत लाभार्थ्यांना मिळणार होते.

अर्धवट कसे द्यायचे?

औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील म्हणजेच एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांनाही हा शिधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गौरी-गणपतीला आणि दिवाळीला असे दोनदा हा शिधा मिळणार आहे. ई-पॉस मशिनद्वारे याचे वितरण करण्यात येईल. गौरी-गणपतीसाठी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या काळात आणि दिवाळीसाठी १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. ई-पॉस मशिनवर हा शिधा अपलोड करण्यात आला आहे. प्रशासनाकडून लाभार्थ्यांना शिधा वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, अर्धवट शिधा कसा वितरित करायचा, असा सवाल विदर्भ रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील आणि नागपूरच्या रेशन दुकानदार संघाचे अध्यक्ष सुभाष मुसळे यांनी उपस्थित केला.
भंडाऱ्यात मुसळधार, वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, संपूर्ण जिल्ह्याला पुराचा वेढा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *