नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली आहे. आयबी व एटीएस यांनी ही कारवाई केली आहे. मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय होता. चित्रीकरण करून ट्रेनने जात असताना नगरसूल येथे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान चौकशी करून संशयित व्यक्तीला सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. आज पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

अनंतनागमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणावरील जळालेला मृतदेह उजैर खानचा? घरातील सदस्यांचे घेतले सँपल, DNA चाचणी होणार

महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणपती बाप्पा अनेक घराघरात मंडळात विराजमान झाले असून या पहिल्याच दिवशी नाशिकच्या मनमाडमध्ये घातपाताचा कट उधळून लावला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरो व एटीएसने अर्थात दहशतवाद विरोधी पथकाने एकाला ताब्यात घेतले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात बॉम्बस्फोटचा प्लॅन, देशभरात घातपाताचा कट, मुसक्या आवळलेल्या दहशतवाद्यांचा तपास NIA करणार

संबंधित तरुणाने मनमाडमध्ये एका सार्वजनिक गणपतीच्या मंडपात चित्रीकरण करुन रेकी केल्याचा संशय होता. गणेश मंडळाचे चित्रीकरण करुन संशयित अजिंठा एक्सप्रेसने जात असतना नगरसूल स्थानकातून रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएस आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.एटीएसने पहाटेपर्यंत संशयिताची कसून चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयित यापूर्वीही गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर असल्याचे समजते. ऐन गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळाचे चित्रीकरण करणाऱ्या संशयताला यंत्रणाच्या सतर्कतेमुळे ट्रेन मधून ताब्यात घेण्यात आल्याने संभाव्य मोठा घातपाताचा कट उधळून लावण्यात आला आहे. मात्र, या संशयित व्यक्तीबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *