गरोदरपणात अंग दुखीने वाचण्यासाठी योग्य पद्धतीने बसणे गरजेचे असते. अनेकदा महिला पाय उपडी करून म्हणजे क्रॉस करून बसतात. मात्र गरोदरपणात या पद्धतीने बसणे योग्य असते का? असं म्हटलं जातं की, पायांना क्रॉस करून बसल्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच रक्तप्रवाहात ही समस्या निर्माण होते. अनेकांना जेवताना, ऑफिसमध्ये काम करताना मांडी उपडी घालून बसण्याची सवय असते. आणि मग ही सवय गरोदरपणात देखील तशीच राहते.

बसण्याच्या योग्य पद्धतीमुळे स्नायूंचे कार्य सुधारते. मानसिक स्वास्थ देखील चांगल राहतं. तसेच ध्यान करण्यास फायदा होतो. आणि रक्तप्रवाह देखील सुधारते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसूतीतही मदत होते. गरोदर महिलांनी त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करावेत आणि स्ट्रेचिंग, चालणे आणि सरळ बसणे यासारख्या सवयींचा समावेश करावा. जर तुम्ही देखील गर्भवती असाल आणि तुम्हाला मांडी उपडी घालून बसण्याची सवय असेल तर असे करणे योग्य आहे की नाही हे तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​गरोदरपणात मांडी घालणे योग्य आहे का?

प्रत्येक गर्भवती महिला प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेते. पाय मोकळे करून बसल्यामुळे (टेलर सिटिंग) पेल्विस उघडण्यासाठी आणि डिलीवरी होताना बाळाला बाहेर येण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच यामुळे गरोदर महिला लेबरकरता देखील तयार होते. त्याचे फायदे लक्षात घेऊन काही स्त्रिया पूजेनंतर घरातील कामे करताना, योगासने आणि ध्यान करताना या स्थितीत बसतात.

​डॉक्टरांचा सल्ला

मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटरच्या मेडिकल डायरेक्टर आणि आयव्हीएफ एक्सपर्ट डॉ. शोभा गुप्ता सांगतात की, गरोदरपणात उपडी मांडी घालून किंवा स्क्वॅट पोझिशनमध्ये बसल्याने पेल्विक रिजनचे स्नायू मजबूत होतात. ज्यामुळे डिलिव्हरी होण्यास मदत होते. डॉक्टर स्वतः महिलांना शेवटच्या महिन्यांत प्रसूतीसाठी जमिनीवर बसण्याचा सल्ला देतात.

​या महिलांनी घालू नये मांडी

जमिनीवर मांडी घालून बसण्याचे अनेक फायदे असतील. परंतु काही गर्भवती महिलांना फिजिओथेरपिस्टने अशा पद्धतीने बसण्यास मनाई केली आहे. जर तुम्हाला ओटीपोटाचा त्रास असेल किंवा कंबरदुखीचा त्रास असेल तर तुम्ही या स्थितीत बसणे टाळावे. अशावेळी तुम्ही हलक्या योगासनांचा पर्याय स्वीकारू शकतो.

​इतर कारणे

याशिवाय, सिम्फिसिस प्यूबिस डिसफंक्शनमध्ये पेल्विसची पोझिशन स्थिती देखील बदलते. पायांवर खूप वजन पडू शकते, ज्यामुळे वेदना होतात. गरोदरपणात आधीच महिलांना अवघडल्यासारख वाटत असतं अशावेळी तुम्ही तुम्हाला जी पद्धत त्रासदायक नसेल त्यास्थितीत बसणे गरजेचे असते.

(वाचा – सोनम कपूरने दाखवली बाळाची पहिली झलक, बाळाचं नाव ‘या’ दोन महापुरुषांच्या प्रेरणेतून))

​यापासून कोणाचा होतो बचाव

जास्त वेळ पायाची मांडी घालून बसल्याने पाय आणि टांचावर दाब पडतो आणि रक्तप्रवाह ठप्प झाल्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सला सूज येते. काही महिलांना जास्त वेळ कोणत्याही स्थितीत बसल्यानंतर पाठदुखीचा त्रास होतो. यामुळे कोणत्याही स्थितीत बसल्यावर त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(वाचा – प्रियंका चोप्राची लेकीसोबत ‘या’ ठिकाणी पहिली ट्रिप; मुलांसोबत फिरण्याचे असतात असंख्य फायदे))

मांडी घालण्याचे फायदेसमजून घ्या

जमिनीवर मांडी घालून बसणे किंवा उपडी मांडी घालून बसणे खूप आरामदायक आहे आणि यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे मांड्यांचे स्नायू देखील ताणते ज्याचा नॉर्मल प्रसूतीकरता मदत करते. त्यामुळे अनेकदा पायांचे किंवा मांड्याचे योगा गरोदरपणात करण्याचा सल्ला डॉक्टर करतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.