मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता गश्मीर महाजनीने त्याच्या अभिनयाने इंडस्ट्रीत मोठं नेम-फेम कमावलं. त्याने मराठीसह हिंदी सिनेमातही भूमिका गाजवल्या. गश्मीरचे वडील रविंद्र महाजनी सिनेसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखले जात होते. १५ जुलै रोजी पुण्यात कार्डियक अरेस्टने त्याचं निधन झालं. त्यांचं निधन झालं त्यावेळी ते पुण्यात एकटेच राहत होते. त्यांच्या निधनानंतर गश्मीरवर, त्याच्या कुटुंबावर टीका करण्यात आली होती. पण त्याने आपली बाजू मांडत अनेक प्रश्नांची उत्तरही दिली होती.

नुकतंच गश्मीरने इन्स्टाग्रामवर #askme सेशन घेतलं. इन्स्टावर स्टोरी पोस्ट केल्यानंतर गश्मीरला त्याच्या अनेक चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले. गश्मीरला त्याच्या आगामी प्रोजेक्टसह अनेक विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. नुकतंच निधन झालेल्या रविंद्र महाजनी यांच्याबाबतही त्याला प्रश्न विचारण्यात आला. ‘वडील वारले की केस कापतात यावर काय बोलाल. मला तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडेल’ असा प्रश्न नेटकऱ्याने गश्मीला केला होता. या प्रश्नाचं गश्मीरने उत्तर दिलं.
संतोष जुवेकरसोबत दिसली महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री; दोघांचा एकत्र फोटो चर्चेत
वडील वारल्यानंतर केस कापण्याबाबत नेटकऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गश्मीर म्हणाला, की मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचं अर्थांजन होतं. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का? असा सवालही गश्मीरने केला.

गश्मीरने केलेल्या #askme सेशनमध्ये अनेकांनी त्याचं कौतुकही केलं. अनेकांनी त्याला पुढील आगामी प्रोजक्टमध्ये पाहण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

बंद खोलीत आढळलं शव, १९७४ ते १९९० चा काळ गाजवलेले रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड

दरम्यान काही दिवसांपूर्वी गश्मीरने एक पोस्ट शेअर केली होती. पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच… असं कॅप्शन देत त्याने व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत प्रविण तरडेही दिसत आहेत.

हा व्हिडिओ पाहून गश्मीर लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. गश्मीरच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहत्यांनीही त्याच्या या आगामीच प्रोजेक्टबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *