घटस्फोटासाठी नवाज मोदींच्या मागणी
ET च्या रिपोर्टनुसार नवाज मोदी सिंघानिया यांनी पती गौतम सिंघानिया यांच्या एकूण संपत्तीपैकी ७५^% रक्कम कौटुंबिक सेटलमेंट अंतर्गत गौतम सिंघानिया यांच्याकडे मागितली आहे. तर या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचा हवाला देत रिपोर्टमध्ये नवाज मोदींनी स्वतःसाठी आणि त्यांच्या दोन मुली निहारिका आणि निसा यांच्यासाठी ही मागणी केल्याचे सांगण्यात येत असून गौतम सिंघानिया यांनीही ही मागणी बऱ्यापैकी मान्य केल्याचे बोलले जात आहे.
गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती
भारतातील सर्वात जुन्या उद्योगपती कुटुंबाचे प्रतिनिधी गौतम सिंघानिया सध्या रेमंड्स ग्रुपचे MD आणि अध्यक्ष आहेत. मुकेश अंबानी यांच्यानंतर मुंबईत त्यांचे दुसरे सर्वात महागडे आणि आलिशान घर असून सिंघानिया आपल्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्यांची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर (सुमारे ११ हजार कोटी रुपये) असल्याचे सांगितले जाते. यानुसार नवाज मोदी यांनी घटस्फोटासाठी ८,२५० कोटी रुपयांची आहे म्हणजेच हे घटस्फोट प्रकरण ८ हजार कोटी रुपयांपेक्षा महाग असेल.
भारतातील सर्वात महागडा घटस्फोट
नवाज मोदी यांची मागणी मान्य केल्यास आणि त्यांच्यानुसार सेटलमेंट झाल्यास हा भारतातील सर्वात महागडा घटस्फोट ठरेल. दरम्यान, यापूर्वी देशात अनेक मोठे हाय-प्रोफाईल घटस्फोटाची प्रकरणे समोर आली असून यापैकी बहुतेक प्रकरणे बॉलीवूडशी संबंधित आहेत. हृतिक रोशन आणि सुझैन खान यांच्या घटस्फोटाचे प्रकरण भारतातील सर्वात महागडे असल्याचे म्हटले जात असून बॉलीवूड अभिनेत्याला आपली पहिली पत्नी सुझैन यांना पोटगी म्हणून सुमारे ४०० कोटी रुपये द्यावे लागले होते. अशा स्थितीत बॉलीवूडमधील या घटस्फोटाच्या तुलनेत सिंघानिया घटस्फोट प्रकरण कितीतरी पटीने महाग ठरेल.
जगातील सर्वात महागडा घटस्फोट कोणाचा?
त्याचवेळी, जागतिक पातळीवर अनेक महागडी घटस्फोटाची प्रकरणे समोर आली आहेत. या यादीत जेफ बेझोसपासून ते बिल गेट्सपर्यंत जगातील आघाडीच्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांचा घटस्फोट ३८ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३.२ लाख कोटी रुपयांमध्ये सेटल झाला होता. तर बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट ७३ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८ लाख कोटी रुपयांमध्ये झाला होता. अशाप्रकारे जगभरात अब्जावधी डॉलर्सची घटस्फोटाची प्रकरणे आहेत, परंतु गेट्स दाम्पत्याचे सेटलमेंट आतापर्यंत सर्वात महागडे ठरले आहे.